-->
बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करिता 12 फरवरीला दिल्ली जाम करू - बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य

बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करिता 12 फरवरीला दिल्ली जाम करू - बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य

• लाखांदूर येथील धम्म मेळाव्यात मार्गदर्शन

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता 12 फेब्रुवारी 2026 ला दिल्ली जाम करू असा इशारा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनी लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म रॅलीला मार्गदर्शन करताना विचार मंचावरून सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने बिटि अॅक्ट 1949 रद्द करून बिहार सरकारने तो बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावा असेही ते पुढे म्हणाले.

 याबाबत केंद्रातील व बिहार मधील सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास 12 फेब्रुवारीला दिल्ली जाम करू असा इशारा सुद्धा उपस्थित असलेल्या लाखो बौद्ध बांधवांना दिला.धम्म रॅली त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून सुरू करण्यात आले.. कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शी सम्राट अशोक परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमानिमित्त बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत विनाचार्य ,लोब सांग तेनपा, भंते चित्त ज्योती स्थवीर,भदंत महामोगलायन थेरोसावंगी ,भंते शीरभद्र चीचाळ, भदंत चारुदत्त ओपारा , भदंत कुणाल कीर्ती, यांचे नेतृत्वात धम्म रॅलीचे

 आयोजन करण्यात आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अशोक वानखेडे वरिष्ठ पत्रकार दिल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय सुषमाताई अंधारे सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत मुंबई उपस्थित उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून बौद्ध धम्मा विषयी माहिती दिली .त्याचप्रमाणे या धम्म मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना एकत्रित आणून त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण व्हावी व समाजातील सकारात्मक बदलाव याकरिता धम् मेळाव्याची गरज असल्याचे सांगितले. विशेष अतिथी म्हणून अँड शैलेश नारनवरे कायदे सल्लागार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नागपूर , विशेष अतिथी म्हणून

 अँड स्मिताताई कांबळे नागपूर उपस्थित उपस्थित होत्या. प्रामुख्याने सायंकाळी ७ वाजता संगीतमय प्रबोधन फैजानभाई ताज सुप्रसिद्ध भीम कव्वाल नागपूर यांचा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश वासनिक उद्योजक सोनी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. दिवेश कांबळे प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी उपस्थित होते. उपाध्यक्ष अनिल दहिवले उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव, कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज बनसोड यांनी केले. यावेळी लाखांदूर तालुक्यातील व जिल्ह्यातील बौद्ध बांधव उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करिता 12 फरवरीला दिल्ली जाम करू - बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article