भंडारा विद्युत विभागाच्या लघु प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजाचा संचालकांकडून आढावा.
शनिवार, 13 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- मानव संसाधन संचालनालयाकडून भंडारा गोंदिया जिल्ह्याचे एकमेव संसाधन व सुनियोजित लघु प्रशिक्षण केंद्राचे अवलोकन करून प्रति वर्ष 2000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण केंद्र म्हणून समाधान व्यक्त केला.मानव संसाधन संचालणालयाचे संचालक राजेंद्र पवार आणि मानव संसाधन संचालणालयाचे कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी भंडारा स्थित विद्युत भवन लागतं च्या सं व सु. लघु प्रशिक्षण केंद्राला आकस्मिक भेट घेऊन दि. 11 डिसेंबर 2025 ला सं.व.सु. मंडळ, भंडारा व गोंदिया अंतर्गत कार्यरत असलेल्या लघु प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजा विषयी आढावा घेतला. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे उपकार्यकारी अभियंता अभिलाश सोमकुवर यांना मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार, संचालक तसेच कार्यकारी संचालक परेश भागवत, यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.विविध विषयावर प्रश्न विचारून प्रशिक्षण केंद्रामधील विविध उपक्रम, कामकाजाची गती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेतला.
कामकाजाची पद्धत, प्रशिक्षणाची शिस्तबद्धता आणि प्रगती याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी भंडारा मंडळातील प्रशासन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौं प्रीती फुले यांच्या मार्गदर्शनात आणि उपकार्यकारी अभियंता अभिलाष सोमकुवर यांनी राजेंद्र पवार आणि परेश भागवत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी विदयुत विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे प्रशिक्षण केंद्रातील कार्यसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्याचा संकल्प केंद्राने व्यक्त केला आहे.
0 Response to "भंडारा विद्युत विभागाच्या लघु प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजाचा संचालकांकडून आढावा."
एक टिप्पणी भेजें