लाखनी येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा.
गुरुवार, 4 दिसंबर 2025
Comment
दत्त नामाच्या गजरात दुमदुमली लाखनी नगरी.
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक क जनता की आवाज"
लाखनी :- स्थानिक प.पू. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदासस्वामी महाराज श्री गणेश दत्त राधाकृष्ण गुरु मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता श्री दत्त मंदिरापासून लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये महिला, पुरुष व तरुणांचे मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.
दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी घरासमोर सुंदर सडा–रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत केले. दिंडीवर पुष्पवर्षाव करत भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी घरासमोर येणाऱ्या दत्त दिंडीचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.
दुपारी १२ वाजता दत्त जन्म सोहळ्यानिमित्त पाळणा हलवून दत्त जयंती विधीपूर्वक साजरी करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपासक, भक्तगण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी गोपाल काळ्याचे कीर्तन तसेच दुपारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "लाखनी येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा."
एक टिप्पणी भेजें