जंगल निर्माणाचे महान कार्य,प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक जंगलांचे निर्माण होणे गरजेचे आहे ...
बुधवार, 3 दिसंबर 2025
Comment
अमोल आळंदकर
"साप्ताहिक जनता की आवाज "
नांदेड : - शहरात प्रत्येक घराच्या अंगणात काही वृक्ष आहेत पण शहराबाहेर शेतीचे पट्टे सोडून बाकी जंगल ओकबोक दिसत.मैल न मैल खुरटी किंवा काटेरी झाडे दिसतात .विविध पक्षी, प्राणी,पशु याचं आश्रयस्थान,घनदाट
जंगल,तेच नाहीसे होत असल्यामुळे पशु पक्षी साहजिकच शहरांकडे वळतात ,शेतांकडे आकृष्ट
होतात आणि मानवाच्या रोषाला बळी पडतात .
शहरातील झाडे वाळल्यामुळे वादळात लवकर
पडतात ,वीज खंडित ,वित्त हानी ,जीव हानी होते .
ज्याप्रमाणे वृक्ष तोडी साठी कंत्राट दिले जाते तसेच..
जंगल निर्माणासाठी कंत्राट दिले जावे विविध संस्था ,सेवाभावी संस्था ,धनवान व्यक्ती यांनी सामाजिक वनीकरण विभागाद्वारे हे कार्य हाती घ्यावे.अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत असलेली मुळ भारतीय वृक्ष
संपदा वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब ,बहावा ,अर्जुनवृक्ष ,कवीठ ,चिंच आवळा यांचे रोपण कटाक्षाने
केले जावे .पहिले पाच वर्षे या वृक्षांची योग्य निगा राखल्यास पुढे 250 ते 300 वर्षे हे वृक्ष मानवास
व निसर्गास उपकारक आहेत.प्रिय व्यक्तींच्या स्मृती निमित्याने स्मृतीवनांची कल्पना प्रत्येक
गावाने राबवावी.गावतलावाच्या सभोवताली घनदाट वृक्ष निर्माण झाले तर निसरगाच संतुलन साधेल.
विविध जीव संस्कृती अरण्याच्या सहाय्याने बहरतील .प्राणी ,पशु ,पक्षी त्यांच्या खर्या खुर्या
आश्रय स्थानात सुखनैव विसावतील .
निसर्गाच्या अन्न साखळीची प्रत्येक कडी सक्षम बनेल .
पर्यायाने विनाश थांबेल .
पाण्याचे प्रयत्न पूर्वक साठवण व घनदाट अरण्याच निर्माण व संवर्धन
निसर्गाच्या अन्न साखळीच्या लहरीपणाला लगाम घालू शकेल.
नुकसानीची तीव्रता कमी होईल
जोपर्यंत आपल्या पृथ्वीवर घनदाट अरण्य ,असंख्य तलाव, पशु, पक्षी भरपूर प्रमाणात असतील
तोपर्यंतच मानव सुखात असणार आहे .पृथ्वीच संतुलन कायम राहण्यासाठी मानवाने सुरु केलेलं
जंगल निर्माण हे महान कार्य असणार, आहे,
0 Response to "जंगल निर्माणाचे महान कार्य,प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक जंगलांचे निर्माण होणे गरजेचे आहे ..."
एक टिप्पणी भेजें