-->
संताजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सावरबंध येथे तेली समाज मंडळाचा उपकम.

संताजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सावरबंध येथे तेली समाज मंडळाचा उपकम.


.                 संत संताजी जगनाडे महाराज 

"साप्ताहिक जनता की आवाज" वुत्तपत्र प्रतिनिधी 

 साकोली :- सावरबंध येथे संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज मंडळातर्फे सोमवारी (दि. ८) संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.

याप्रसगी संत गुरुमाऊली वसंत बाबा बेंदवार आणि संत विठ्ठलदास बाबा मेंढे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये होत्या. लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवराम गिरेपुंजे उपस्थित होते. लाखनी येथील जगन्नाथ कापसे यांना मूर्तीदाते म्हणून सत्कारमूर्तीचा मान मिळाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुनी मोर येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तुळशीकर, साकोली पंचायत समितीच्या माजी उपसभापती सरिता करंजेकर, सावरबंध ग्रामपंचायत सरपंच माधवी

विद्यार्थ्यांचा सत्कार; कुटुंब प्रबोधनावर मार्गदर्शन

यावेळी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मुंगले, देवानंद बडवाईक, भगवान बडवाईक, मंगेश झिंगरे, भोजराम बडवाईक, चंद्रकुमार बडवाईक आणि आत्माराम खंडाईत यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. वसंत बाबा यांनी संत संताजी जगनाडे महाराजांची यशोगाथा सांगितली. शिवराम गिरेपुंजे यांनी संतांचे महत्त्व आणि कुटुंब प्रबोधन यावर मार्गदर्शन केले. वनिता डोये यांनी महाराजांचे सामाजिक महत्त्व विशद केले. माधवी बडवाईक यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. डॉ. अनिल शेंडे यांनी संतांचे आचार-विचार सदोदित अंगीकारावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती आणि पंचामृत प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी तेली समाज बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन देवानंद बडवाईक आणि भागवत बडवाईक यांनी तर आभार भगवान बडवाईक यांनी मानले.

बडवाईक, सावरबंध ग्रामपंचायत उपसरपंच डॉ. अनिल शेंडे, वडद ग्रामपंचायत सरपंच भारती बडवाईक, मोहन बडवाईक, डॉ. आलोक कापगते,

टोमेश्वर भाजीपाले, खंडाळा येथील माजी पोलिस पाटील शेखर निर्वाण, सावरबंध येथील मिलिंद बौद्ध विहार समिती अध्यक्ष वंदना उके आदी उपस्थित होते.

0 Response to "संताजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सावरबंध येथे तेली समाज मंडळाचा उपकम."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article