-->
दत्त जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलन व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

दत्त जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलन व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्याचा उपक्रम

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी.

नांदेड :- अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित साहित्य संस्थेमार्फत दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य कविसंमेलन व महाप्रसाद कार्यक्रम अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि साहित्यिक रंगतदार वातावरणात पार पडला. बालाजी मंदिर, स्नेहांजली कॉलनी, नांदेड येथे हा सोहळा रविवारी संध्याकाळी झाला. मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, कवी, महिला, युवक, समाजकार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात दत्ताच्या प्रतिमेचे पूजन करून शांत व भक्तिमय वातावरणात झाली. सदानंद सपकाळे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला सुसंवादी सुरुवात झाली. दत्त जयंतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव व त्यात साहित्याचा सुगंध अशी सुंदर मेळ साधणारा हा उपक्रम यंदा विशेष गाजला. कार्यक्रमाचे अध्यक्षा सुनंदा भगत म्हणाले, साहित्य ही फक्त अभिव्यक्ती नसून समाज बदलण्याची ताकद आहे. दत्त जयंतीसारख्या दिवशी कवींच्या माध्यमातून मूल्य, संस्कार आणि सामूहिकता जागवणे ही अक्षरोदय साहित्य मंडळाची परंपरा आहे. कवी-कलावंतांना व्यासपीठ देणे, त्यांना मान देणे आणि साहित्यिक बंध वाढवणे हा आमचा उद्देश पुढेही असाच राहील. समाजातील बदल, सद्भावना, कवींची भूमिका आणि साहित्याची दिशा यावर त्यांनी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. अशोक कुबडे आणि मा. दत्ता वंजे उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून, कविसंमेलन म्हणजे समाजाला शब्दांनी घडवण्याचे कार्य. आज ऐकलेल्या कवितांमधून समाजातील वेदना, आशा आणि बदलाची हाक स्पष्ट जाणवली. अशा भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी कवी लेखकांचे प्रोत्साहन, युवा पिढीला साहित्याकडे ओढण्याचे प्रयत्न यांचे कौतुक केले. कविसंमेलनात राज्यातील अनेक प्रतिभावंत कवींनी सहभाग घेतला. पंडित पाटील बेरळीकर, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, प्रज्ञाधर ढवळे, मोरे सर, वाघमारे ताई, रुपाली वाघरे, पवळे सर, बालाजी भागानागरे, मनिषा सपकाळे भावकविता, सामाजिक कविता, ओवी, विनोदी चारोळ्या, स्त्रीविषयक काव्य, ग्रामजीवन, पर्यावरण, आध्यात्म

विचार अशा विविध रंगांनी संपूर्ण मंच भारावून गेला. कर्वीच्या ओजस्वी सादरीकरणांवर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद दिली. अनेक कविता विचारप्रवर्तक तर काही कविता विनोद आणि मिश्कीलपणाने रसिकांना खळखळून हसवणाऱ्या ठरले. या उपक्रमात महिला कवींनी अत्यंत प्रभावी कविता सादर केल्या. महिलांच्या 'भावविश्वापासून ते सामाजिक मुद्यांपर्यंत त्यांच्या कविता ठसठशीतपणे समोर आल्या. रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाचे मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशात संस्थेच्या पुढील मान्यवर सदस्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली सौ. चव्हाण ताई, मनिषा सपकाळे, वाघमारे ताई व अनेक सदस्यांनी समन्वय करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला. कविसंमेलनानंतर आयोजित महाप्रसादात मोठ्या संख्येने भक्त व नागरिक सहभागी झाले. समाजातील विविध घटक एकत्र येऊन केलेले भोजन हा एकात्मतेचा सुंदर प्रतीक ठरला. संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन चंद्रकांत चव्हाण (राज्य सहसंपर्क प्रमुख) यांनी केले. त्यांचे नियोजन, संपर्क व समन्वय कौतुकास्पद ठरले. दत्त जयंतीच्या निमित्ताने साहित्य, संस्कृती, भक्ती आणि सामूहिक सलोखा यांचा अद्भुत संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमाने नांदेड शहरात साहित्यिक जागर निर्माण केली असल्याचे सर्व उपस्थितांचे मत होते. अक्षरोदय साहित्य मंडळाने अशा कार्यक्रमांची पुढेही परंपरा चालू ठेवावी, अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त व्यक्त करण्यात आली.

0 Response to "दत्त जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलन व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न..!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article