-->
बीट जमादाराच्या निष्क्रियतेमुळे यात्रेतील जुगार अनियंत्रित बनले.

बीट जमादाराच्या निष्क्रियतेमुळे यात्रेतील जुगार अनियंत्रित बनले.

.                   यात्रेतील जुगारचा अडा

गंगाधरराव शेवाळकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड/शहापूर :- देगलुर तालुक्यातील शहापूर येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या वार्षिक उत्सव अंतर्गत स्थानिक स्तरावर भव्य यात्रा पार पडत असते अखंड हरिनाम सप्ताहाच्या अनुषंगाने पंचक्रोशीतील भाविक वर्ग मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत असतात जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी वर्ग यात्रेत आवर्जून येत असतात तालुक्यात सर्वात मोठी यात्रा म्हणून येथील यात्रेची ओळख सर्वत्र आहे तब्बल दहा ते बारा हजार यात्रेकरूंची यात्रेत ये - जा असते असे असताना मात्र स्थानिक पोलीस चौकीतील बीट जमादाराचे यात्रेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्या ऐवजी यात्रेतील जुगार कसे सुरळीत चालू शकेल याकडेच त्यांचे सर्वाधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे स्थानिक बीट पोलीस जमादार समक्ष यात्रेत सकाळच्या सत्रात १०:३० पासुनच " तितली- पतंग " नामक जुगाराचे शुभारंभ झाल्याचे दिसून आले मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर पोलीस चौकी कार्यालय असुन त्या ठिकाणी बीट जमादार हे महाशय तळ ठोकून असल्याचे दिसून आले विशेष म्हणजे पोलीस चौकी तुन बीट जमादार हे यात्रेतील जुगाराकडे येऊ नयेत याची काळजी जुगार चालकाचे समर्थक घेत असल्याचे दिसून येत होते व ते प्रदिर्घ कालावधी पर्यंत पोलीस चौकीतच थांबल्याचे दिसून आले यात्रेत स्थानिक जुगार चालका सह बिलोली, मुखेड व इतर ठिकाणचे 'तितली- पतंग' नामक बडे जुगार चालक बीट पोलीस जमादार यांच्या छुप्या सहमतीनेच यात्रेत खुलेआमपणे जुगार चालवत असल्याचे चर्चा सर्वत्र होत आहे तेव्हा या गैर प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर विशेष पोलीस उप महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरीत घेऊन बेशिस्त बीट जमादार कणकवले यांची बदली तालुक्या बाहेर करण्यात यावे व यात्रेतील जुगार चालकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.




0 Response to "बीट जमादाराच्या निष्क्रियतेमुळे यात्रेतील जुगार अनियंत्रित बनले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article