भीम शाहीर सदानंद मोरे यांचा संगम काव्यधारा पुस्तक देऊन चैत्यभूमी मुंबई येथे सत्कार.
बुधवार, 10 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई :- प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे यांनी प्रबोधनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबोधनातून डॉ. बाबासाहेब यांना चैत्यभूमी दादर मुंबई 6 डिसेंबर महानपरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना जाहीर सत्कार करण्यात आला.भारतीय संविधानाचे शिल्पकार ,बोधिसत्व ,परमपूज्य महामानव, युगपुरुष दिनदुबळ्यांचे उद्धार करते, ज्ञान पंडित, प्रज्ञा सूर्य ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून कधी होतील भीमा तुझ्या भेटीसाठी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनांसाठी, तो लाल भिमाईचा भारी लाखो हजारात, चंदनासमान झिजला तो साक्षी आहे ,संविधान क्रांतिकारी गीत सादर केले . यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विष्णु शिंदे, संगम काव्यधारा कवी गायक संगम कासारी यांनी प्रकाशित केलेली पुस्तक भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संगम कासारे, गायक उत्कर्ष शिंदे ,गायक गौतम हराळ, गायक रवींद्र गमरे ,गायक अजय शिंदे ,भीम शाहीर प्रदीप कडबे, गायक भगवान कानडे ,गायक हार्दिक कासारे, गायक देवानंद जगताप ,गायक धोंडीबा रोडे, गायक अनिल लेहनार, गायक अशोक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संजय जामनेर , पोलीस मुंबई सुनील धांडे ,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमदार प्रकाश गजभिये इत्यादी मोठ्या संख्येने समाज बांधव गायक कलावंत उपस्थितीत होते.
0 Response to "भीम शाहीर सदानंद मोरे यांचा संगम काव्यधारा पुस्तक देऊन चैत्यभूमी मुंबई येथे सत्कार."
एक टिप्पणी भेजें