-->
गोंड गोवारी समाज धडकेल ११ डिसेंबरला नागपुरात.

गोंड गोवारी समाज धडकेल ११ डिसेंबरला नागपुरात.

• संविधानिक हक्कासाठी विधान भवनावर धडक मोर्चा • जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन 

"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी 
 
भंडारा :- गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचा घटनात्मक दर्जा आणि सोबतचे सर्व हक्क पुर्ववत मिळावे यासाठी येत्या गुरुवारी ११ डिसेंबरला सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम ते मॉरीस कॉलेज पर्यंत विधानभवनावर भव्य धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष कृती समितीचे राज्य कार्यकारी संयोजक विजय वाघाडे व साकोली विभागाचे संयोजक विजय चौधरी यांनी केले आहे. 

             संघर्ष कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार या गुरूवारी ११ डिसेंबरला स. १० वाजता गोंड गोवारी समाजवतीने "संविधानिक हक्कासाठी" या धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रमुख मागण्या ह्या आहेत. १) राज्य शासनाने, न्या. वडणे समितीचा अहवाल तात्काळ प्राप्त करावा व सिविल अपील क्र. ४०९६/२०२० मध्ये दि. १८/१२/२०२० रोजी मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार दि. २४ एप्रिल १९८५ चा जी.आर. मधील ' गोंड गोवारी' जमातीची चुकीची व असंविधानिक सांस्कृतिक रुढी, परंपरा, चालीरीती, देवदेवतांची माहिती तात्काळ दुरूस्ती करुन या जमातीला लावलेले असंविधानिक क्षेत्र बंधन तात्काळ हटवावे. 'गोंड-गोवारी' अ.ज. प्रमाणपत्र / वैधता प्रमाणपत्रासह अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पुर्ववत सुरू केल्याबाबतचा सुधारीत शासन निर्णय संघर्ष कृती समितीच्या हातात द्यावे. २) संविधानिक 'गोंड गोवारी' जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश तसेच शिष्यवृत्ती व नोकरीकरिता येत असलेल्या अडचणी तात्काळ दुर कराव्यात. ३) यापूर्वी 'गोंड गोवारी' जमातीच्या आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ४) गडचिरोली जिल्ह्यात सन. १९५० पुर्वीचे मुळ महसुली रेकॉर्डवर खोडतोड करुन तयार केलेल्या बनावट 'गॉड गोवारी' महसुली पुरावे तयार करुन मिळिवलेले जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रांची चौकशी करून दि. १८/०९/२०२४ ला सहआयुक्त, अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांना दिलेल्या तक्रारीप्रमाणे संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करावी. ५) महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन परिपत्रक क्र. बैठक क्र.३०७०/प्र.क्र.११२/का-१० मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२४ चा शासन परिपत्रक रद्द करावे. ६) 'गोंड गोवारी' जमातीचे अभ्यासासाठी नेमलेल्या न्या. के. एल. वडणे समितीच्या अहवालाचा संदर्भ देऊन इतर मागास बहूजन कल्याण विभागाकडून विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाच्या कल्याणासाठी निर्गमीत केलेला शासन निर्णय, इतर मागास बहूजन कल्याण विभाग क्र.२०२४/प्र.क्र.९/ योजना - ३ दि. १५ ऑक्टोबर २०२४ आणि शासन निर्णय, महाराष्ट्र शासन, इतर मागास बहूजन कल्याण विभाग क्र. २०२५/प्र.क्र.११/ योजना-३ दि. ८ जुलै २०२५ अन्वये विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाच्या कल्याणासाठी गठीत केलेली संनियंत्रण समिती तात्काळ बरखास्त करावी. अश्या मागण्या संदर्भात हा धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

             सदर मोर्चाला गुरूवार ११ डिसेंबरला सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथे गोंड गोवारी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संयोजक विजय वाघाडे, साकोलीचे विजय चौधरी, जिल्हा सहसंयोजक पुनिदास काळसर्पे, किशोर लसुंते, गणेश सोनवाने, भोजू राऊत, धनिराम भोयर, मन्साराम भोंडे, किशोर चौधरी, इंद्रपाल नेवारे, रेवचंद गजबे, रामभाऊ येसनसुरे, अरूण वघारे, प्रमोद राऊत, मुन्ना राऊत आणि सर्व गोंड गोवारी समाजातील विविध पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

0 Response to "गोंड गोवारी समाज धडकेल ११ डिसेंबरला नागपुरात. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article