इथे वाहिली जाते अधिकाऱ्यांच्या कर्तव्याला श्रद्धांजली
बुधवार, 31 दिसंबर 2025
Comment
• हानिकारक द्रव्य मिश्रित ताडीची विक्री; पापाचा भागिदार कोण ?
गंगाधर देगलूरकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड/बिलोली :– तालुक्यातील कुंडलवाडी, बिलोली, सगरोळी येथे निव्वळ ताडी विक्री करणार असल्याच्या परवानाखाली थाटलेल्या दुकानातुन व या दुकानदारांनी कांही खेडे गावात नेमलेल्या एजन्ट कडून सरत्या वर्षाचे शेवटचे दिवस ३१ डिसेंबर रोजी हजारो लिटर हानिकारक द्रव्य वापरून नशा येणाऱ्या ताडीची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.या ताडीचे दर देशी दारू पेक्षा खूपच कमी केवळ १५ ते २० रूपये असल्याने गोरगरीब मद्य प्राशन करणाऱ्या बहुतांशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याचा कुठलाच विचार न करता दुधाची तहान ताकावर भागवण्या सारखे या नशा येणाऱ्या अप्रमाणीत ताडीकडे वळले. या तालुक्याचा विचार केल्यास येथे ताडी पिणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या शिवाय देशी दारूचे दर वाढल्याने अनेक जणं या घातक ताडीकडे वळले आहेत.
गेल्या कांही महिण्या पासून संपूर्ण तालुक्यात शरीरास हानिकारक अशी विक्री होत असलेली रासायन मिश्र ताडी बंद करा यासाठी ओरड सुरू आहे. तरी पण डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी गेल्या आठ दिवसा पासून रासायन मिश्र जास्तीची ताडी बनवण्याची तयारी करीत असल्याचे दिसून आले पण अधिकाऱ्यांना मात्र कसे काय दिसून आले नाही? हा प्रश्न उपस्थित होतो.
कांहीही झाले तरी येथील उत्पादन शुल्कचे निरिक्षक किंवा जिल्ह्याचे भरारी पथक ठोस अशी कार्यवाही करण्यास तयार होत नाहीत. या पासून दर महिण्याला लाखोची उगलाढाल होत असल्यानेच खाल पासून ते वर पर्यतचे जबाबदार अधिकारी मनाची नसेल तरी चालेल पण जनाची तरी ठेवून हा प्रकार बंद करण्यासाठी पूढे येत नाहीत अशी जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे.या पापाला भागीदार कोण व अभय कुणाचे हे गुढ रहस्य जनतेने उलगडण्याची गरज आहे.
0 Response to "इथे वाहिली जाते अधिकाऱ्यांच्या कर्तव्याला श्रद्धांजली "
एक टिप्पणी भेजें