-->
तुमसरचा अभिमान – शारदा विद्यालयाचे आदर्श मतदान केंद्र ७/३ व ७/४

तुमसरचा अभिमान – शारदा विद्यालयाचे आदर्श मतदान केंद्र ७/३ व ७/४

लोकशाहीला नवा चेहरा देणारे केंद्र!..

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर:- नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये तुमसरमध्ये अनेक मतदान केंद्रे उभी असली तरी,
शारदा विद्यालय, बजाज नगर येथील आदर्श मतदान केंद्र ७/३ आणि ७/४
यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीचा उत्सव साकारला, त्या उत्साहाने संपूर्ण शहर थक्क झाले आहे.
मतदारांचे स्वागत — सन्मानाच्या मार्गाने :- 
मतदान केंद्रात प्रवेश करताच फुलांनी आणि फुग्यांनी सजलेला आकर्षक मार्ग,
भिंतींवरील जागृती संदेश, रांगोळीचे सडेसोडीत डिझाईन…
संपूर्ण वातावरण जणू मतदारांना सांगत होते—
इथे तुमच्या प्रत्येक मताचा आदर आहे!..
 
पहिल्या मतदारांसाठी विशेष रोपटे — आशेचं प्रतीक

‘प्रथम मतदाराना अक्षवंत करून,रोपटे देऊन , बँड पथकाच्या सुरेल आवाजात केलेलं स्वागत तुमसरकरांच्या मनात भावूक ठरलं.
ही केवळ शाब्दिक स्तुती नव्हे;
ही आहे लोकशाहीच्या संस्कारांची बियाणी पेरण्याची सुंदर कृती.

बँड पथकाचा उत्साह – लोकशाहीची नादमय सुरुवात

शाळेच्या बँड पथकाच्या सुरांनी केंद्राचा परिसर भारावून गेला.
त्यांचे ताल जणू राष्ट्राचा जयघोष करत होते— *मतदान म्हणजे आपली शक्ती, आपली ओळख*!

बंटी आणि बबली यांनी दिलेला १०० टक्के मतदान करा हा संदेश मतदारांचे लक्ष वेधून घेत होते

विद्यार्थिनींचे पारंपरिक स्वागत — संस्कृतीचा सुगंध

महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशात सजलेल्या विद्यार्थिनींनी प्रथम मतदारांचे स्वागत करत
केंद्राला एक वेगळाच ‘संस्कारमय’ स्पर्श दिला.
अधिकाऱ्यांच्या भेटींनी वाढले केंद्राचे महत्त्व

या आदर्श केंद्राला जिल्हास्तरीय अधिकारी वर्गाने भेट देत प्रशंसा व्यक्त केली.
भेट देणाऱ्यांमध्ये —
I.A.S.मा. सावनकुमार साहेब (जिल्हाधिकारी)
मा. निलेश मोरे साहेब (Additional SP)
मा.  करणकुमार चव्हाण साहेब (मुख्याधिकारी)
सहाय्यक निवडणूक अधिकारी
मा.शिवम् विसापूरे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "तुमसरचा अभिमान – शारदा विद्यालयाचे आदर्श मतदान केंद्र ७/३ व ७/४"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article