-->
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार -ॲड.डाॅ.सत्यपाल कातकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार -ॲड.डाॅ.सत्यपाल कातकर

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

छत्रपती संभाजीनगर :- येथे  महार रेजिमेंट चे माजी सैनिक व ऑल इंडिया  समता सैनिक दल,डिव्हिजन व ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद द्वारे आयोजित कार्यक्रमात "भारतीय  संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सांसदिय लोकशाही" या विषयावर प्रसिद्ध मनोवैज्ञानिक,  डॉ.सत्यपाल कातकर,
अधिवक्ता,उच्च न्यायालय तथा संविधानतज्ञ  दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते..
सर्वप्रथम महार रेजिमेंटचे माजी सैनिक व ऑल इंडिया समता सैनिक दल तर्फे क्रांती चौक येथून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली व त्यानंतर नंदनवन कॉलनी येथील वामनदादा कर्डक खुले प्रांगणात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे  मार्गदर्शक श्री शिरीषजी बनसोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद जालना यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी संविधान निर्मितीत कसे महत्वपूर्ण योगदान दिले ह्यांचे विस्तृत मुद्देसूद मत व्यक्त केले तर परिसवांदाचे मुख्य मार्गदर्शक डॉ.सत्यपाल कातकर,
संविधानतज्ञ तथा अधिवक्ता,उच्च न्यायालय म्हणाले, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना संविधान सभेत येण्यास अतोनात विरोध झाला,ते बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल व शेड्युल कॉस्ट फेडरेशनच्या सहयोगाने  संविधान सभेत सदस्य म्हणून नियुक्त झाले व दिनांक १७ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी  मार्गदर्शन केले ज्यात भारताच्या अखंडतेची व भविष्यात निर्माण  होणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीची व मुस्लिम लीगची भूमिका  ह्यावर व आपसातील मतभेद बाजूला सारून एकत्रित आल्यास ह्या देशाला अखंडते पासून कुणीही रोखू शकत नाही असे विद्वतापूर्ण मार्गदर्शन केले यामुळेच बंगालची फाळणी झाल्यावर डॉ. आंबेडकरांचे सदस्य गेल्यानंतर त्यांना  मुबंई प्रांताचे मुख्यमंत्री बी.जी.खेर ह्यांनी डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांचे आदेशानुसार संविधान सभेत मुंबई प्रांतातून पुन्हा संविधान सभेत  पाठविण्यात आले व बिझनेस कमिटीने त्यांना दिनांक २९ ऑगस्ट १९४७ ला मसुदा कमिटीच्या चेअरमन पदी नियुक्त केले. ब्रिटिश राजवटीत भारत सरकार कायदा १९३५  ब्रिटिश संसदेने मंजूर व केला ज्यात १४ भाग, ३२१ कलम, १० परिशिष्ट्ये होती तर भारतीय संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी   आपल्या बुद्धी कौशल्याचा  वापर करून ३९५ अनुच्छेद २२ भाग,अनुसूची ८ मूळ स्वरूपात २ वर्षे ११ महिने १७ दिवस अथक परिश्रम घेऊन मसुदा कमिटीचे  चेअरमन म्हणून संविधानसभेत अनेक मुद्द्यावर वादळी उत्तरे देऊन मुद्देसूद मांडणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला लिखित संविधान  दिले त्यामुळे कुणी कितीही विरोधात ओरड केली तरीही सत्य हेच आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत तसेच हजारो जाती व प्रांतात विभाजीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी  नावीन्यपूर्ण सांसदीय लोकशाही दिली ज्यात विधिमंडळ, कार्यकारी मंडळ,
न्यायपालिका ह्यां तीन अंगात अधिकाराची विभागणी केली त्यात राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री,सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट,नियंत्रक व महालेखापरीक्षक, निवडून आयोग आदीची रीतसर विभागणी केली. गोलकनाथ, केशवानंद भारती, मीनरव्हा मिल्स  ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे कायदेशीर दाखले देऊन डॉ.सत्यपाल कातकर  म्हणाले "भारतीय संविधानाच्या मुळ  सिद्धांताना कुठेलेही सरकार हात लावू शकत नाही. विधिमंडळ व कार्यकारी मंडळ ह्यांना नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केली आहे व सामान्य जनेतेचे मौलिक अधिकार, न्यायिक अधिकार ह्यांचे कुणी हनन करू नये यासाठी अनुच्छेद 
२२६ व ३२ द्वारे न्यायिक अधिकार दिलेत.सुभाष कश्यप,
अनिल मिश्रा 
यांचेद्वारे निर्माण होत असलेल्या संविधान संभ्रमावर रोखठोकपणे संविधानतज्ञ म्हणून उत्तरे दिलीत तसेच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी संविधानतज्ञ अर्थात विद्वान वकिलांची फौज तयार करण्याचे आव्हान  केले व रोखठोकपणे मुद्देसूद विचार व्यक्त केले."याप्रसंगी ऋषिजी वाघमारे, समाज क्रांती आघाडी ह्यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभेदार लेफ्टनंट बाजीराव सोनुने होते तर विचारमंचावर सुभेदार विलास शिरसाठ, कारभारी त्रिभुवन,अध्यक्ष, ऑल इंडिया समता सैनिक दल व दादासाहेब राजहंस होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कारभारी त्रिभुवन ह्यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. प्रज्वलीत बनसोडे,ॲड. मयुरी बोर्डे व ॲड. आम्रपाली वावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव घोरपडे, कमलबाई त्रिभुवन, दिलीप गंगावणे, प्रियंका अंभोरे, शंकर मस्के, संगीता भगत, शोभा जगताप आदिनी अथक परिश्रम घेतलेत.

0 Response to "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार -ॲड.डाॅ.सत्यपाल कातकर"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article