केसलवाडा पवार येथे पशु चिकित्सा व रोग निदान शिबिर
रविवार, 14 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केसलवाडा/पवार येथे शुक्रवार(ता.१२ डिसेंबर) पशु चिकित्सा व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील पशु पालकांनी आपल्या पशूची विविध रोग तपासणी करून रोग निवारण करण्याकरिता उपचार करण्यात आले. शिबिरात डॉ. लता देशमुख यांनी पशुधन विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व डॉ. विठ्ठल हटवार यांनी योजनेचे लाभ घेण्याबाबत व त्यासंबंधी अर्ज व पत्र व्यवहार करण्यासंबधी मार्गदर्शन केले. तसेच सरपंच रोमिला रामेश्वर बिसेन यांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर बिसेन यांनी केले. शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत केसलवाडा/पवार, पशू संवर्धन विभाग पंचायत समिती लाखनी अंतर्गत करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी(विस्तार) डॉ. लता देशमुख, पशुधन पर्यवेक्षक डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. योगेश कापगते, सहाय्यक अमित देशमुख यांनी पशूंची तपासणी करून उपचार केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच रोमिला रामेश्वर बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रा.प. सदस्य रामेश्वर बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी दत्ता पोहरकर, सामाजिक कार्यकर्ता कैलास भगत, तिरुपती महाविद्ध्यालय प्राचार्य कडगाये, जि.प. शाळा मुख्याध्यापक रामटेके, शिक्षिका वणवे मॅडम, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा बोपचे, शाळा समिती अध्यक्ष जयश्री येळेकर, राधेलाल बिसेन, यांनी केले व शिबिराला मिनाक्षी रहांगडाले, गेंदलाल सहारे, नागो पुराम, वसंत रहांगडाले, झनक रहांगडाले, बिसन कडव, आत्माराम कोचे, केवळ खंडाते, पुरुषोत्तम बोपचे, रमेश पटले, लिलाधर रहांगडाले, राजु उईके, धर्मेंद्र बडोले, वसंत रहांगडाले, नागो पुराम, दुलीचंद बोपचे व मोठ्या संखेने पशूपालक उपस्थित होते.
0 Response to "केसलवाडा पवार येथे पशु चिकित्सा व रोग निदान शिबिर "
एक टिप्पणी भेजें