डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे दोन व्याख्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित
सोमवार, 8 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी येथील प्रभावी वक्ते, कवी, नाटककार, कलावंत आणि समीक्षक प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांची ' राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' आणि ' भारतीय संविधानाचे सामर्थ्य' ही दोन व्याख्याने आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्तविभाग या वृत्तविषयक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सायंकाळी सव्वा सात वाजता प्रसारित करण्यात आली.
याच वृत्त विशेषात जगात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाणाचे, आपले घरदार विकून चित्रीकरणाचा खर्च करणाऱ्या नामदेव व्हटकर यांच्या कन्या लेखिका शालिनी कळंबे यांचीही वडिलांच्या त्यागाची माहिती याच वृत्तात समाविष्ट करण्यात आली आहॆ. आज जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाणाची एकमेव असणारी जी चित्रफित आपणास दिसते ती नामदेव व्हटकर यांचीच होय.
मुंबई आकाशवाणी वरून प्रसारित झालेला पंधरा मिनिटांचा हा कार्यक्रम न्युज ऑन एआयआर वर लाईव्ह ऐकता येईल तथा मुंबई
एआयआर न्युज च्या युट्युब वाहिनीवरूनही केव्हाही त्याचे ध्वनीमुद्रण ऐकता येईल.
या कार्यक्रमाच्या संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले ह्या
होत्या. लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर यांचे तर प्रसारण सहाय्य गुरुनाथ तिरवणकर यांचे होते.
0 Response to "डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे दोन व्याख्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित "
एक टिप्पणी भेजें