दानामंडी फील्लौर पंजाब येथे बामसेफ चे ४२ वे अधिवेशन.
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- पंजाब राज्यातील दानामंडी फील्लौर जालंधर येथे बामसेफ या संघटनेचे 6 ते 9 डिसेंबर पर्यंत चार दिवसीय 42 वे वैचारिक परिवर्तन अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी 6 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त न्यायाधीश रत्नाकर भेंगारा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे विधिवत उद्दघाटन होईल. इंजि. आर. एल.ध्रुव यांच्या अध्यक्षतेत प्रमुख अतिथी म्हणून देवराज सुमन, डॉ. के. एस. चौहान, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.7 डिसेंबर रोजी एन.एस.गंगाधर यांच्या अध्यक्षतेत प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय इंगोले, इंजि. आर एस राम, आलोक कुमार,शत्रूजीत सिंह, तरसेम लालचाहल, डॉ.ज्योती कल्याणी, डॉ.अमृत कौर,संजय मोहिते,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
8 डिसेंबर रोजी सुनिती कपारवाल अरुणकुमार गुप्ता,जावेद पाशा कुरैशी , डॉ. मुनेहा कुमार, सुरेश द्रविड,सरदार बालवीर सिंह,सुभाष सैनी, शिफत खान, डॉ विनोद आर्य, सुरेश कोथ, इंजि. सीताराम,नितीन गणोरकर, डॉ.शर्मिष्ठा गौतम, डॉ जितेंद्र सिंग,शैल, डॉ.अरविंद कुमार, रामेश्वर ठाकूर,
करुणानिधिजी आदी मान्यवर उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
9 डिसेंबर रोजी इंजि. आर. एल.ध्रुव हे उपस्थिती राहून संबोधित करणार आहेत.
भारत देशातील बुद्धिप्रामाण्यवादी सुजान नागरिकांनी अधिवेशन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Response to "दानामंडी फील्लौर पंजाब येथे बामसेफ चे ४२ वे अधिवेशन."
एक टिप्पणी भेजें