बहुजन बांधवांनो संविधानाचे संरक्षण करा.. उल्हास बंसोड.
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य ज्ञानसूर्य बहुजन नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात ओ बी सी, एस सी, एस टी, एन टी, व्हि जे एन टी, एस बी सी या बहुजन समाजाच्या हिताचे असे सर्वसमावेशक संविधान निर्माण करून ते २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला अर्पण केले आणि हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अधिकृतपणे लागू झाले तेव्हा पासून भारत देश प्रजासत्ताक देश बनला आणि भारत देशाचा राज्यकारभार संविधानावर चालत आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य ज्ञानसूर्य क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ओ बी सी समाजासाठी ३४० वी कलम, एस सी समाजासाठी ३४१ वी कलम आणि एस टी समाजासाठी ३४२ वी कलम लिहून ठेवली असून या
कलमातील तरतुदीनुसार बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकांना सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय सोयी सवलती आणि आरक्षण मिळत आहे.एकंदरीत बहुजन समाजाला संविधानाने स्वातंत्र्य, समता बंधुता न्याय प्रदान केले आहे ही डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सर्वसमावेशक अशा भारतीय संविधानाची पुण्याई आहे याचे बहुजन समाजातील बुद्धिप्रामाण्यवादी नागरिकांनी भान ठेवले पाहिजे .बहुजन समाजातील सुजान नागरिकांनो
आपले संविधान दत्त हक्क अधिकार न्याय अबाधित ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य ज्ञानसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सर्वसमावेशक अशा बहुजन समाजाच्या हिताचे लोक कल्याणकारी असलेले भारतीय संविधानाचे संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे मत संविधान प्रेमी कार्यकर्ते उल्हास
बंसोड यांनी एक मुलाखती दरम्यान व्यक्त केले.
0 Response to "बहुजन बांधवांनो संविधानाचे संरक्षण करा.. उल्हास बंसोड."
एक टिप्पणी भेजें