शारदा विद्यालयातील स्नेह सम्मेलन : माजी विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रवास ठरणार विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ.
सोमवार, 29 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- पूजा शिक्षण संस्था, तुमसर द्वारा संचालित शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे आयोजित “स्नेह सम्मेलन सोहळा २०२५–२६” हा यंदा विशेष अर्थपूर्ण ठरणार असून, शाळेचे माजी विद्यार्थीच प्रमुख व विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार असल्याने हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या स्नेह सम्मेलनात शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांचा संघर्षमय प्रवास व यशकथा आजच्या विद्यार्थ्यांना ध्येय, परिश्रम व आत्मविश्वासाची प्रेरणा देणाऱ्या ठरणार आहेत.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थी
मा. योगिता परसमोडे – बाल विकास प्रकल्प अधिकारी, साकोली,
डॉ. स्नेहा गभने – M.B.B.S., M.S. (नेत्र चिकित्सक), भंडारा,
मा. शुभम गायकवाड – चार्टर्ड अकाउंटंट, नागपूर,
डॉ. स्मिता आसोले – B.A.M.S., C.G.O., कामठा आश्रम,
मा. मनिषा समरीत – मुख्याध्यापिका, तुमसर,
मा. रसिका वैद्य – कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तुमसर,
डॉ. जितेंद्र कुंभलकर – M.B.B.S., तुमसर,
मा. दुर्गा लांजेवार – ग्राम महसूल अधिकारी, अरोली,
मा. शिल्पा रंगारी – सहाय्यक शिक्षिका, सावनेर,
मा. अदिती कालबांधे – सामाजिक कार्यकर्त्या, तुमसर,
डॉ. सानिका भिवगडे – फिजिओथेरपिस्ट, नागपूर,
मा. इंजि. प्रयास डोंगरे – सॉफ्टवेअर डेव्हलपर, मुंबई
यांची उपस्थिती लाभणार आहे.
मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन
मा. राजूभाऊ कारेमोरे, आमदार, तुमसर–मोहाडी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी
मा. महाबीरप्रसादजी अग्रवाल, अध्यक्ष, पूजा शिक्षण संस्था, तुमसर राहणार आहेत.
या दिवशी इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
बुधवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
तर गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी विविध शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण
मा. उपेशजी अंबादे, तहसीलदार, तुमसर व
मा. इंजि. सागरभाऊ गभने, अध्यक्ष, नगर परिषद, तुमसर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
“हीच शाळा, हेच संस्कार आणि आजचे यश” हा संदेश माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने हा स्नेह सम्मेलन सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्य घडणीचा मार्गदर्शक उत्सव ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुख्याध्यापक श्री. राहुल प्रेमलाल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
0 Response to "शारदा विद्यालयातील स्नेह सम्मेलन : माजी विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रवास ठरणार विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ."
एक टिप्पणी भेजें