-->
पोलिस पाटलांचे रेती घाटावरील कर्तव्य बंद करा

पोलिस पाटलांचे रेती घाटावरील कर्तव्य बंद करा


 • पोलिस पाटील संघटनेचे आ. परिणय फुके यांना निवेदन.
 
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली, तुमसर व भंडारा ह्या उपविभागातील टव रेती घाट व रेती डेपोवर कार्यक्षेत्राबाहेर जाऊन प्रशासनाने कर्तव्य बजावण्यास भाग पाडल्याने रेती घाटावरील कर्तव्य बंद करावे या करिता भंडारा जिल्हा पोलिस पाटील संघटनेच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांना निवेदन देण्यात आले आहे. 
          पोलिस पाटलांना गावाच्या हद्दीबाहेर इतर लिलाव न झालेले रेती घाट व डंपिंग केलेल्या घाटाच्या ठिकाणी पोलिस पाटील मागील १५ दिवसापासून कर्तव्य बजावत आहेत. पोलिस पाटलांचा कार्यक्षेत्राबाहेर १० ते १५ किलोमीटर अंतरावर रेती घाट असल्याने गावातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून कर्तव्य लावण्यात आलेले आहेत. कर्तव्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आत्मसुरक्षा नसल्याने रेती माफिया भविष्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस पाटलांचे कर्तव्य आपल्या प्रभावाने रेती घाटातून बंद करण्यात यावे. या करिता भंडारा जिल्हा पोलिस पाटील संघटनेच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष एकनाथ बांते यांचेसह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

0 Response to "पोलिस पाटलांचे रेती घाटावरील कर्तव्य बंद करा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article