-->
पंचायत समितीचा कारभार रामभरोसे,कशाची कशाला ताळमेळ नाही.

पंचायत समितीचा कारभार रामभरोसे,कशाची कशाला ताळमेळ नाही.

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"

नांदेड :- घरकुल लाभार्थींना पैसेच मिळतं नाहीत त्यांच्या खात्यात चेक जमा करत नाहीत पैसे घेतल्याशिवाय, कुणाला पहिला हप्ता मिळाला सहा महिने झाले दुसरा हप्ता मिळाला नाही, कोण्या लाभार्थींला दुसरा हप्ता मिळाला एक वर्ष झाले तर तिसरा मिळतं नाही कोण्या लाभार्थींच यादित नाव असून सहा महिने होऊन गेले तरी पहिला हप्ता च मिळाला नाही हा सावळा गोंधळ आहे काय! आणि पंचायत समिती मध्ये चाललंय काय जनतेला कळेनास झाले आहे ,कुणी हप्ता कसा मिळाला नाही, पंत प्रधान आवास योजना यादीत तर नांव आहे पैसे का मिळत नाही त कुणाला दुसरा हप्ता मिळाला नाही तर कुणाला तिसरा हप्ता मिळाला नाही, लाभार्थी तहसील च्या चकरा मारुन बेजार झाले आहेत, आणि पैसे दिले त्यांचें चेक खात्यात ज्या होत आहेत, आणि गरिब लोकांना तुमचं बांधकाम किती झाले, एवढेच झाले का फोटो तुमच्याच बांधकामाचा आहे का, इंजिनिअर येऊन तपासणी करतील मगच तुमचा चेक खात्यात जमा होईल उगाच चकरा मारुन आम्हास परेशान करू नका असे उत्तर गटविकास अधिकाऱ्यांन पासुन कर्मचार्याप्रयंत देत आहेत, ज्यांनी चिरीमिरी दिली त्यांना असे प्रश्न न विचारता पैसे मंजूर होतात हे किती दिवस चालणार गरिब लोकांना पक्के घर मिळेल का! नाही, पंचायत समिती विभागात अधिकारी ते सिपाई सर्वच भ्रष्टाचारी आहेत, चोरुन लपून नाही सर्रास उघड उघड पैसे मागताना दिसतात हे मुजोर कर्मचारी इतके बेडर झालेले आहेत,एक तर गटविकास अधिकारी नांदेड येथे काही दिवस ही टिकत नाही दुसरें आले कि म्हणतात मी नविन आहे, हळूहळू कळेल तेव्हा मी सांगतो,तो पर्यंत जिकडी तिकडी करुन, गेले ,असा गारुडी खेळ पंचायत समिती तहसील मध्ये चालू आहे,हा
सावळा गोंधळ चालु आहे तो थांबला पाहिजे ,नाही तर प्रहार दिव्यांग संघटन, नांदेड,तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, विजय चौडेकर, प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष,सावळा गोंधळ जो चालू आहे तो थांबला पाहिजे, आणि त्याकरिता मा,राहुल कर्डिले जिल्हा अधिकारी,व जिल्हा परिषद अधिकारी सी,ई,ओ,मिस मेघना कावली माॅडम यांनी लक्ष द्यावे आणि घरकुल मध्ये जो सावळा गोंधळ चालु आहे, भ्रष्टाचार करणार्या वर कडक कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे,

0 Response to "पंचायत समितीचा कारभार रामभरोसे,कशाची कशाला ताळमेळ नाही."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article