-->
प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे भद्रावती येथे सन्मानित.

प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे भद्रावती येथे सन्मानित.

.     भीमशाहीर सदानंद मोरे यांना  सम्मानीत करतानीं


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

चंद्रपूर /भद्रावती :- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात सोमठाणा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 28 डिसेंबर 2025 रोज रविवारला तथागत बुद्ध विहार नवीन सोमठाणा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश टिपले होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक रमेशचंद्र राऊत यांच्या हस्ते पार पडले .प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक मधुकरराव बावनकर ,एडवोकेट पुनम वाघमारे ,अजय देगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य, विजय वानखेडे, प्रवीण कवाडे ,प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे ,माजी समाज कल्याण सभापती वीजभूषण पांझारे, श्रीधर भगत ,प्रभाकरराव डोंगरे ,माजी नगरसेवक राहुल चौधरी ,नितीन मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक सुवीसाठे ,यशवंत टिपले माजी नगरसेविका ,सीमा दगडे माजी नगरसेविका ,ज्योती भगत, विकास दुर्योधन ,प्रवीण कवाडे, नाना देवगडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील दापुरा येथील प्रबोधनकार भीम शाहीर सदानंद मोरे यांना पुष्पगुच्छ ,प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कवी के पाटील वर्धा ,ज्येष्ठ समाजसेवक सुफी सय्यद शमशुद्दीन ,बी आर ढगे पत्रकार ,संतोष सोनवणे, प्राध्यापक महादेव गपाट, कार्यक्रमाचे मुख्य आयोजन कवी गायक आनंद भगत यांनी केले .संचालन प्रभाकरराव डोंगरे, कार्यक्रमाचे आभार मधुकरराव बावलकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव गावातील नागरिक गायक कलावंत उपस्थितीत होते.

0 Response to "प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे भद्रावती येथे सन्मानित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article