दलित वस्तीत पायाभूत सुविधांची वानवा
मंगलवार, 30 दिसंबर 2025
Comment
• निलागोंदी येथील प्रकार, सिमेंट रस्त्याची प्रतीक्ष
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
, लाखनी :- ग्रामीण भागातील दलित वस्तींचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते.या मागचे मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातीच्या समाजाचे लोक समुहाने गावाच्या परिसिमेत वास्तव्य करून राहावे या वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी-सुविधा पुरवून तेथील लोकांचे सर्वांगीण विकास व जीवनमान उंचावण्यासाठी 1974 पासून दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करण्यात आली सदर योजनेचे नामकरण 'दलित वस्ती सुधार योजना' ऐवजी 'अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे' असे करण्यात आले आहे. ही योजना जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाते.अनूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ज्यात पाणी, मलनिस्सारण, गटार बांधणे, वीज पुरवठा, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, समाजमंदिर, इत्यादी कामे करून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे हा योजनाचा मुख्य उद्देश आहे. मागील कोरोना काळापासून या योजनेंतर्गतची कामे संत गतीने होत आहेत. याचाच प्रत्येक्ष प्रत्येय लाखनी तालुक्यात गावपातळीवर बहुतांश दलित वस्त्यांमध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे. त्याला निलागोंदी ग्रामपंचायत अपवाद नाही यागावात मोठ्या प्रमाणात दलित लोकवस्ती आहे. मात्र मागील वित्तीय वर्षात मात्र येथील दलित वस्तीत नवीन कामे घेण्यासाठी मात्र निधीची मोठ्या प्रमाणावर वानवा जाणवत आहे. निलागोंदी येथील अनुसूचित जातीचे लोक चिखलातून ये-जा करीत असून रोडवर खड्डे पडले असून पाणी साचत असल्याने डासांमुळे पावसाळ्यात उदभवणारे आजाराची भीती निर्माण होण्याची शक्यता झाली असलीतरी दरवर्षी ग्रामपंचायत पातळीवर वारंवार सिमेंट रोडचा प्रस्ताव पाठवूनही उपयोग झालेला नाही त्यामुळे अनुसूचित जातीच्या समाजातील लोकांप्रती शासन किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याने गांभीर्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निलागोंदी येथील अनुसूचित जाती समाज बांधवानी केली आहे.
0 Response to "दलित वस्तीत पायाभूत सुविधांची वानवा"
एक टिप्पणी भेजें