-->
कवलेवाडा व मेंगापूर येथे स्वच्छता पर्व ! मुख्यमंत्री पंचायतराज अभियान.

कवलेवाडा व मेंगापूर येथे स्वच्छता पर्व ! मुख्यमंत्री पंचायतराज अभियान.

.        स्वच्छता करतानां अनेक तरुण व पदाधिकारी 
• पदाधिकारी व तरुणाई यांचा सहभाग.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी.

 पालांदूर :- दिवसेंदिवस वाढत्या रोग राहिला आडा घालण्याकरिता स्वतःचे घर व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. स्वच्छते शिवाय आरोग्य सुदृढ राहू शकत नाही. स्वच्छता व आरोग्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राष्ट्रसंतांच्या विचारातूनही स्वच्छतेला आधार पुरविण्यात आला. कवलेवडा व मेंगापूर येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व

तरुणाईने स्वच्छता अभियान पार पाडले.

रविवारला शक्यतो विद्यार्थी, कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुट्टी असते. त्यामुळे स्वच्छता अभियानात प्रत्येकाने सहभाग घ्यावा या हेतूने स्वच्छता पर्व बाजार चौकात पार पडले. प्रत्यक्ष सरपंच मनीषा खंडाईत यांनी हातात झाडू घेत इतरांना प्रेरणा दिली. बघता बघता... तरुणांनी सुद्धा स्वच्छतेला हातभार लावला.

यांची होती उपस्थिती...

सरपंच मनीषा खंडाईत, उपसरपंच प्रमोद भुते, ग्रामअधिकारी प्रदीप चेटूले, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण मेश्राम, संगीता खंडाईत, देवांगना कहालकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजश्री धर्मशहारे, देवेंद्र चौधरी, सिताराम खंडाईत, डाटा ऑपरेटर सतीश हजारे, स्वप्निल खंडाईत व तरुणाई उपस्थित होते. कचरा संकलन करून स्वच्छतेचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

0 Response to "कवलेवाडा व मेंगापूर येथे स्वच्छता पर्व ! मुख्यमंत्री पंचायतराज अभियान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article