तुमसर एमआयडीसीत ३५ वर्षांत केवळ सहा उद्योग.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
• बेरोजगारी कशी दूर होणार? : विकासाच्या केवळ बाता.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्याकरिता व तरुण उद्योजकांना संधी मिळावी याकरिता सुमारे ३५ वर्षापूर्वी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत येथे केवळ सहा उद्योग - स्थापित झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी कशी दूर होणार? असा प्रश्न उपस्थित होत असून विकासाच्या बाता येथे सुरू आहेत.
देव्हाडी येथे राज्य शासनाच्या एमआयडीसी विभागाकडून शेतकऱ्यांची सुपीक शेती ताब्यात घेण्यात आली. त्यांना नाममात्र मोबदला देण्यात आला. सुमारे आठ ते दहा हेक्टर शेती येथे घेण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गाजवळ ही शेती असल्याने शेत शेतकऱ्यांचे येथे लाखोंचे नुकसान झाले आह. आहे. यावर मात्र मोबदला देण्याबाबतही कुठलीही हालचाली झालेल्या नाहीत, हे येथे उल्लेखनीय. दोन्ही बाजूने या परीसराचा विकास झालेला नाही.
• चार दशक लोटूनही हव्या त्या प्रमाणात उद्योग स्थापना नाही.
• अन् उद्योजकांनी बळकावले भूखंड!.
राष्ट्रीय महामार्गाजवळील अत्यंत महत्त्वपूर्ण जागेवरील एमआयडीसीमधील उद्योजकांनी येथे भूखंड बळकावले आहे. अजूनपर्यंत तिथे उद्योग उभा केला नाही. त्यावर राज्य सरकारने कारवाई केली नाही. तीन वर्षांत उद्योग उभा न केल्यास तो भूखंड शासन जमा करण्याचा नियम येथे आहे. शासनाकडून येथे अद्याप कारवाई करण्यात आली नाही.
• एमआयडीसीचे मुख्य कार्यालय गोंदियात का?..स्थानिक • प्रतिनिधी दखल का?. घेत नाही.
एमआयडीसी तुमसर तालुक्यात असून कार्यालय गोंदिया येथे आहे. स्थानिक भंडारा जिल्ह्यातील एमआयडीसीचे मुख्य नाही. येथील एमआयडीसीवर देखरेख व स्तरावर कुणालाच त्याची माहिती मिळत नियंत्रण करण्याचे काम मुख्य कार्यालय गोंदियाचे आहे. परंतु त्याकडे त्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. एमआयडीसी परिसरात झाडी झुडपे वाढली असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे व येथील कोणत्याही उघोग क्षेत्रात चालना मीळत नाही त्यांमुळे गोंदिया येथेच मुख्य कार्यालय का?.तुमसर या भंडारा येथे.का?.नाही याची स्थानिक प्रतिनिधीने दखल का?.घेत नाही याचा संभ्रम वाटतो .
• बेरोजगारीत वाढ!..
शासनाने तालुक्यातच उद्योग स्थापन व्हावे, स्थानिक उद्योजकांना येथे संधी मिळावी तसेच स्थानिक परिसरातील बेरोजगारी दूर व्हावी या हेतूने एमआयडीसी स्थापन केली. परंतु त्या एमआयडीसीचा काहीच उपयोग होताना येथे दिसत नाही.
भाडेतत्त्वावर उद्योग घेतले!..
येथील एमआयडीसीत काही उद्योजकांनी भाडेतत्त्वावर उद्योग दिल्याची गंभीर माहिती येथे आहे. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. एमआयडीसीतील कोणताही उद्योग हा भाडेतत्त्वाने दिला जात नाही. तसेच भूखंडही येथे भाडेतत्त्वाने दिले जात नाही. या नियमाकडेही दुर्लक्ष होत असल्याचे समजते.
0 Response to "तुमसर एमआयडीसीत ३५ वर्षांत केवळ सहा उद्योग."
एक टिप्पणी भेजें