नाकाडोंगरीत आदिवासी गोवारी शहीद दिन.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- नाकाडोंगरी आदिवासी गोवारी समाजाने बुधवार, १० डिसेंबरला त्यांच्या ११४ शहीद बांधवांच्या स्मृतिदिनी मोठ्या जागरूकतेने उपक्रम पार पाडला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूरच्या झिरो माइलवर बलिदान दिलेल्या शहिदांसाठी गाव एकत्रित आला होता.
सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजराने, गोवारी परंपरागत पोशाखातील समाजबांधवांनी गाव रॅली काढली. तरुणांमध्ये स्वाभिमान आणि अधिकारासाठी जाज्वल्य आत्मविश्वास पाहायला मिळाला, तर वयोवृद्धांच्या डोळ्यांत इतिहासाची वेदना होती. शहीद स्मारकावर सामूहिक मौन आणि श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाला अविनाश सोनवाने, नामदेव ठाकरे, महेश्वरी नेवारे यांनी समाजाला एकत्र येऊन संघटित राहून हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. यावेळी सुमित गौपाले, विजय राऊत, डॉ. सचिन बावनकर, राजेश वाघमारे आदी समाजबांधव उपस्थित होते.
0 Response to "नाकाडोंगरीत आदिवासी गोवारी शहीद दिन."
एक टिप्पणी भेजें