-->
धर्माबाद तालुक्यातील ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी साहेब यांच्या पत्राला केराची टोपली...

धर्माबाद तालुक्यातील ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी साहेब यांच्या पत्राला केराची टोपली...


 विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
नांदेड :- सविस्तर वृत्त असे की ३डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन असल्या कारणाने प्रहार जिल्हा उपाध्यक्ष श्री माधव गंगाधर पांचाळ जारीकोटकर यांनी गटविकास अधिकारी साहेब यांना पत्र देऊन दिव्यांग दिन प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये साजरा करण्यात यावा व त्याचा ५%निधी लवकरात लवकर खर्च करण्यात यावा अशी विनंती केली व गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना पत्र काढलं व हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी सूचना दिली पण तालुक्यातील काही ग्राम पंचायत वगळता सर्व ग्रामसेवकांनी या पत्राला केराची टोपली दाखवली असून असे करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दिव्यांग कामात दप्तर दिरंगाई या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी विनंती करणार आहोत , तरी मा.जिल्हा परिषद,C ,E,Ó, मॅडम यांनी दखल घेऊन कारवाई करावी नाही तर विचार पुर्वक प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा तर्फे आंदोलन करण्यात येईल असे दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष माधव पांचाळ जारिकोटकर यांनी केली...

0 Response to "धर्माबाद तालुक्यातील ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी साहेब यांच्या पत्राला केराची टोपली..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article