अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची मोहीम.
शनिवार, 6 दिसंबर 2025
Comment
आमले पदार्थ पथकाची विशेष मोहीम.
• बारा औषधी दुकानांचा परवाना रद्द पण?..
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
नांदेड :- अन्न औषध प्रशासन व अमली पदार्थ विरोधी पथकाच्या संयुक्त पथकाच्या विशेष मोहीम अंतर्गत औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली होती. या तपासण्यांमध्ये १२ औषधी दुकानातून प्रतिबंधित औषधी विक्री होत असल्याचे दिसून आले होते. या दूकानांवर कारवाई करून परवाना रद्द करण्यात आले पण सदर औषधी दुकाने सुरूच असल्याने या कारवाईचर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
नांदेड जिल्ह्यामध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्यातील नियम १९४५ अन्वये अंमली पदार्थ विशेष मोहीम व अमली पदार्थ विरोधी पथक यांच्या समवेत दि. २५-२६ जून व ०७ जुलै २०२५ रोजी शहरातील विविध औषधी दुकानांची तपासणी केली करण्यात आली होती.
या तपासण्यामध्ये १२ औषधी दुकानात प्रतिबंधित औषधी आढळल्याने ९ दुकानांवर अंशतः व तीन दुकानांवर कायम परवाना रद्दची कारबाई करण्यात आली होती. या विशेष मोहिमेमध्ये नांदेडचे ए.टी. राठोड, जालन्याचे जी. आर. जाधव, लातूरचे बि.डी मरेवाड व हिंगोलीचे एन.सी भालेराव या सहाय्यक
आयुक्तांचासह औषध निरीक्षक एम. बी. पैठणे, श्रीमती स्वाती सुपेकर (छ संभाजी नगर श्रीमती एस. के कुपेकर (लातूर) बांचा समावेश होता. विशेष पथकाने औषधी दुकानांची तपासणी केली असता बारा दुकानांबर परवाना रद्दची कारवाई केली होती. परंतु या कारवाईनंतर देखील सदर दुकाने बिनबोभाट सुरू असल्याने कारवाईचे काय झाले असा प्रश्न निर्माण होत आहे.
अन्न औषध प्रशासन व अंमली पदार्थ विरोधी पथकाला गंभीर बाबी आढळल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉफिक पदार्थ कायदा १९८५ (एम.पी.डी.ए.) कायद्यातील प्रतिबंधित औषधीचा व्यापार केल्याने ही कारवाई करण्यात आली होती. बात डॉक्टर लेन येथील व शहरातील नामांकीत मोठ्या दुकांनांचा समावेश आहे. परवाना रद्द करण्यात आलेली दुकाने सुरूच असल्याने याबाबत मोठी शंका निर्माण होत आहे.
0 Response to "अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची मोहीम."
एक टिप्पणी भेजें