-->
नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या संपर्क कार्यालयात आज थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या संपर्क कार्यालयात आज थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



विजय चौडेकर
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- या कार्यक्रमास उमरेकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सोनिया सचिन उमरेकर, डॉ. प्राची दहाड, डॉ. माधव ढगे तसेच उमरेकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी डॉ. सचिन उमरेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समानता व महिलांच्या सक्षमीकरणाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी समाजात शिक्षणाची मशाल पेटवून महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला, असे त्यांनी नमूद केले.
तसेच डॉ. सोनिया सचिन उमरेकर यांनीही महिलांना मार्गदर्शन करत सांगितले की,
“आज आम्ही डॉक्टर म्हणून समाजात उभे आहोत, यामागे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच महिलांनी शिक्षण, आरोग्य व सेवा क्षेत्रात पुढे यावे.”
कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

0 Response to "नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या संपर्क कार्यालयात आज थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article