-->
नागरिकांनो पाणी अडवा पाणी जिरवा!... अशोक कान्हेकर.

नागरिकांनो पाणी अडवा पाणी जिरवा!... अशोक कान्हेकर.

  नरेंद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज"
 
 भंडारा :- पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे.पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही.
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.शेती ,बांधकाम,उद्योग, जल विद्युत निर्मिती केंद्र यासारख्या इतर क्षेत्रात पाण्याची नितांत गरज असते.परंतु अलीकडे प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड करण्यात येत असल्याने दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे
शेततळे,शेतविहीर,बंधारे, रेन 
वॉटर हार्वेस्टिंग योजना कार्यान्वित करून पावसाच्या थेंब थेंब पाण्याची साठवण करून पाणी अडवा पाणी जिरवा करण्याचा कृती संकल्प करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अशोक कान्हेकर यांनी केले.
      अकोलाटोला येथे पाणी अडवा पाणी जिरवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  याप्रसंगी माजी सरपंच सुभाष तितिरमारे यांच्या अध्यक्षते प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कान्हेकर,सरपंच अल्का तितिरमारे उपसरपंच मारोती माटे, ग्रामपंचायत सदस्य निलेश 
टिकापाचे, नितेश शेंडे,मनिषा धांडे,प्रतिमा माटे, असरला पठाण,शुभांगी चव्हाण तसेच नागरिक उपस्थित होते.

0 Response to "नागरिकांनो पाणी अडवा पाणी जिरवा!... अशोक कान्हेकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article