पालांदुर येथील जलसा उत्साहात उसळली गर्दी...
गुरुवार, 8 जनवरी 2026
Comment
पारंपारिक कलांना मिळाला न्याय.
घराघरात पाहुण्यांची रेलचेल.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- दिवाळीत होणारी मंडई उत्सवात शेतीचा हंगाम जोमात राहत असल्याने पाहुणे मंडळी एकमेकांच्या घरी जाणे येणे शक्य नसते. मात्र ही उणीव भरून काढण्याकरिता नव्या जमान्याच्या हिशेबाने मंडईची जागा जलसा उत्सवाने घेतले. दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या बुधवारला पालांदूर येथे जलसा उत्सव उत्साहात पार पडतो.७ जानेवारी रोजी पालांदुरात भव्य दिव्य सार्वजनिक जलसा उत्सव सर्वांच्या सहकार्यातून उत्साहात पार पडला.
पारंपारिक कलांना मंच...
पारंपारिक कलांना हक्काचा मंच जलसा व मंडई उत्सवात हक्काने मिळतो. शाहीर अर्जुन चंदनबावणे ढिवरखेडा यांच्या कला मंचाने खडी गंमत अर्थात तमाशा सादर केला. रोख बक्षिसांची वर्षाव कलाकारांवर करण्यात आला.
महिला मंडळ यांची दंडार...
महिला मंडळ दंडार न्याहार डोंगरगाव येथील महिला कलाकारांनी सादर केली. यांच्यावर सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून गर्दी करीत त्यांचा उत्साह वाढविला.
संजय नगर येथील जलसा उत्सव मंडळींच्या उत्स्फूर्त सहभागाने गत दहा वर्षापासून जलसा उत्सवाचे भव्य आयोजन उत्साहात सुरू आहे. घराघरात उत्साह संचारला असून भल्या पहाटेपासून गावातील सगळे रस्ते स्वच्छ करण्यात आले. घराघरात पाहुणे मंडळींची रेलचेल अनुभवली. रात्रीला मनोरंजनाकरिता पहिल्या टप्प्यात कोल्हापुरी लावणी व दुसऱ्या टप्प्यात तीन अंकी संगीत नाट्यपुष्पाचा अविष्कार सादर झाला. पारंपारिक कलाकारांनी सुद्धा जलसा आयोजक मंडळींचे आभार व्यक्त करीत कलेला व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक सुद्धा केले.
समाजातील अनिष्ट प्रथा व नव्या काळातील नवे संकट दूर करण्याकरिता विज्ञानाचा, संस्कृतीचा, लोकशाहीतील घटकांचा सर्वसामान्यांना अभ्यास व्हावा, याकरिता कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन आम्ही आमच्या कलेतून सादर केले. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमाने आम्ही सुद्धा भारावून गेलो.
0 Response to "पालांदुर येथील जलसा उत्साहात उसळली गर्दी..."
एक टिप्पणी भेजें