तालुका प्रेस वेल्फेअर असोसिएशन तुमसर द्वारा पत्रकार दिवस संपन्न.
शुक्रवार, 9 जनवरी 2026
Comment
•पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो सत्त्य परीक्षण करत असतो - संजय जांभुळकर तहसीलदार
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा/तुमसर :- तालुका प्रेस वेल्फीयर असोसिएशन द्वारा हॉटेल फूड प्लाझा तुमसर येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मा.संजय जांभुळकर तहसीलदार तुमसर यांच्या प्रमुख उपस्थित मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य.बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला माल्य अर्पण करून ज्येष्ठ पत्रकार,संपादक सीतारामजी जोशी (साप्ता. तुमसर व्यापार) यांनी सर्व पत्रकारांची ओळख करून देत प्रेस फेअर असोसिएशन विषयी माहिती दिली. प्रमुख अतिथी संजय जांभुळकर साहेब आपल्या भाषणात म्हणाले "पत्रकारांना लेखनाची बाजू मांडताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून नेहमी.सत्याच्या परीक्षण करत असतो"तसेच पत्रकार दिगंबर देशभ्रतार.(विदर्भ चंडिका) यांनी बाळशास्त्री जांभेकर च्या जीवनावर कविते द्वारे माहिती दिली.तर उपस्थिता मध्ये पत्रकार अशोक हुमणे (लोकमत समाचार),पत्रकार नाना ठावकर (लोकमत),हर्षवर्धन देशभ्रतार (साप्ता.जनता की आवाज") सिताराम जी जोशी (तुमसर व्यापार) काका भोयर (भंडारा पत्रिका)इ.बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे मंच संचालन व आयोजन ज्येष्ठ पत्रकार लिलाधर वाडीभस्मे (दैनिक देशोन्नती) तर आभार प्रदर्शन नाना ठवकर यांनी केले.
0 Response to "तालुका प्रेस वेल्फेअर असोसिएशन तुमसर द्वारा पत्रकार दिवस संपन्न."
एक टिप्पणी भेजें