नायलॉन मांजा विक्री व वापरकर्त्यावर होणार दंडात्मक कार्यवाही.
गुरुवार, 8 जनवरी 2026
Comment
लाखांदूर नगरपंचायतची विशेष मोहीम.
राजन मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- सध्या मकरसंक्रांतीचा पर्व सुरु असून मोठया प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. याला नॉयलन मांजा या सुताचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो.त्यामुळे अनेक अपघात घडून अनेकांना जीव सुद्धा गमवावे लागले आहे. त्यामुळे या नॉयलान मांज्यावर कोर्टाने बंदीसुद्धा घातलेली आहे. असे असून सुद्धा नॉयलन मांजा याची छूप्प्यामार्गाने विक्री सुरु आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यावर व वापर कर्त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची धडक मोहीम नगरपंचायत लाखांदूर तर्फे राबविण्यात आली आहे.
मकरसंक्रातीच्या पर्वावर पतंगबाजी केली जाते.मुलापासून ते मोठ्यापर्यंत पतंग उडविण्याची उत्सुकता असतें.यासाठी नॉयलॉन मांज्याची मोठ्या प्रमाणात मागणी असतें.काही दुकानात छूप्प्यामार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जाते.या मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत.यासाठी लाखांदूर नगरपंचायत तर्फे जनजागृती मोहीम व विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
नायलॉन मांजा झाडावर,खांबावर, रस्त्यावर पडलेला असतो.आकाशात उडणारे पक्षी,व मनुष्याला मांजामुळे मोठया प्रमाणात अपघात घडलेले आहेत.नायलॉन मांजा विक्री व वापर कर्त्यावर पर्यावरण व कोर्टाच्या आदेशानुसार पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.नगर पंचायत लाखांदूर परिसरात पतंग उडवीत असतांना किंवा विक्री करीत असतांना नायलॉन मांजा व साधा मांजा आढळून आल्यास 10 हजार रुपये दंड व 3ते 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाच्या आदेशाने करण्यात येईल.नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे,यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी साजेस मेश्राम व गणेश बालपांडे तसेच न. प. कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहेत.
बॅक्स
-----------
सध्या पतंगबाजीचा पर्व सुरु आहे. त्याला मोठया प्रमाणात नायलॉन मांजा वापरण्यात येतो. त्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत. मांज्यापासून जर पक्षाला इजा पोहचविण्यात येत असेल तर त्यांच्यावर वन्यजीव कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
प्रदीप चन्ने
वनपरीक्षेत्राधिकारी लाखांदूर
0 Response to "नायलॉन मांजा विक्री व वापरकर्त्यावर होणार दंडात्मक कार्यवाही."
एक टिप्पणी भेजें