महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा साकोली तर्फे विद्यार्थ्यांना पत्रकार दिनानिमित्त नोटबुक व पेनाचे वाटप.
शनिवार, 10 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
साकोली :- महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा साकोली जिल्हा भंडारा तर्फे पत्रकार दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 या ठिकाणी साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी, पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, तालुका पत्रकार संघाचे सदस्य संतोष कोरे, तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश राणा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे सदस्य शितल नागदेवे मुख्याध्यापक एम व्हि बोकडे यांच्या उपस्थितीत इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला पत्रकार दिनाचे महत्त्व सांगण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन शितल नागदेव यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी यांनी केले आभार लुथडे मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक यांनी एम व्हि बोकडे, ऊ गो भस्मे,एल आर इळपाते , पी आर क्षीरसागर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली
0 Response to "महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा साकोली तर्फे विद्यार्थ्यांना पत्रकार दिनानिमित्त नोटबुक व पेनाचे वाटप. "
एक टिप्पणी भेजें