-->
सिल्लोड तालुक्यातील मौजे बाळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचार बाबत चौकशी अधिकारी साहेबराव शेळके यांनी केली  गोलमोल चौकशी.

सिल्लोड तालुक्यातील मौजे बाळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचार बाबत चौकशी अधिकारी साहेबराव शेळके यांनी केली गोलमोल चौकशी.

•चौकशी पंचनाम्यामध्ये दोनच ओळीत संपवला विषय.

•वस्तुनिष्ठ प्रकरणाला चौकशी अधिकारी साहेबराव शेळके यांनी दिली बगल.

• तर तक्रार अर्जातील नमूद विषयाची चौकशी अधिकाऱ्यांनी केलीच नाही चौकशी 

•तक्रार अर्जात ग्रामसभा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये कुठेही नाही उल्लेख.

• तक्रारदारांसह इतरांना सरपंच यांच्या नातेवाईक असलेल्या महिलेंकडून अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्यांचा भडिमार 

• या चौकशी अधिकाऱ्यांसमोरच उडाला मोठा गोंधळ 

• स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच सरपंचांनी त्यांच्या महिला नातेवाईकाला केले पुढे.
           सामाजिक कार्यकर्ता(राजु चौव्हाण) 

• मात्र या भ्रष्टाचाराचा पूर्ण मी पाठलाग करणारच तक्रारदार राजू चव्हाण यांची प्रसार माध्यमाला माहिती.

• यामध्ये दोषी असलेले भ्रष्ट सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई होणारच व करून दाखवणारच यांचा ठाम निर्धार.
 
संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

छत्रपती संभाजीनगर/सिल्लोड:- सिल्लोड तालुक्यातील मौजे बाळापुर येथील ग्रामपंचायतीने  केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते  तक्रारदार राजू चव्हाण यांच्या  सह इतरांनी राज्याच्या ग्रामविकासाकडे केलेल्या तक्रारीची राज्य शासनाने  दखल घेऊन तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.छत्रपती संभाजीनगर यांना आदेश दिले होते.

सदर  आदेशानुसार मु.का.अ.यांनी  गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांना सदर प्रकरणाची चौकशी व कारवाई करावी असे पत्र दिले 
त्या पत्रानुसार 

 दिनांक०८/०१/२०२६  रोजी विस्तार अधिकारी साहेबराव शेळके यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून त्या चौकशी अधिकाऱ्याने बाळापुर येथे जाऊन चौकशी केली असता सदर चौकशी ही चौकशी अधिकाऱ्यांनी मूळ विषयाची न करता त्या विषयाला बगल देत ग्रामसभा का घेतली नाही या बाबत चौकशी केली आणि दोन शब्दांमध्ये आपली चौकशी संपवली मात्र ही चौकशी चालू असताना या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

 सरपंच यांची नातेवाईक असलेली महिला जी अंगणवाडीमध्ये सध्या कार्यरत आहे तिने मात्र उपस्थित तक्रारदार व काही लोकांना अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत एक प्रकारे धमक्या दिल्या त्यामुळे या ठिकाणी चौकशीसाठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्याला सुद्धा मनस्ताप करावा लागला 

यावरून असे सिद्ध होते की भ्रष्टाचार राखण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी हे कोणत्या स्तराला जातात हे मात्र या ठिकाणी दिसून आले 

ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांना सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार राजू चव्हाण यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार व तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांनी त्याची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर  यांना सदर प्रकरणाची आपण स्वतः चौकशी करून अहवाल सादर करावा मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर पत्र पुन्हा गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्याकडे फॉरवर्ड करून सदरील तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेशित केले होते. तेव्हा गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी सुद्धा त्यांचे विस्तार अधिकारी पंचायत (पंचायत) साहेबराव शेळके यांना आदेशित केले की राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत बाळापूर येथे जाऊन सदर तक्रारीत नमूद असलेल्या विषयानुसार चौकशी करून चौकशी अहवाल सादर करावा असे पत्र दिले तेव्हा त्या पत्रानुसार विस्तार अधिकारी साहेबराव शेळके यांनी दिनांक०८/०१/२०२६ रोजी बाळापूर येथे सकाळी ९ वाजता येऊन सामाजिक कार्यकर्ते तक्रारदार राजू चव्हाण यांच्या तक्रारीच्या नमूद असलेल्या विषयानुसार चौकशी करणे महत्त्वाचे होते. मात्र तसे न करता त्यांनी फक्त ग्रामसभा का घेतली नाही याबाबत चौकशी केली तक्रार अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, माझ्या तक्रार अर्जामध्ये जो काही ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, बोगस कामे केलेली नाही त्याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी मात्र चौकशी व पंचनामा विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके यांनी चौकशी केली नाही आणि सदर चौकशी ही पूर्णपणे गोलमाल असून ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना एक प्रकारे कसे वाचवता येईल हा मात्र त्यांनी केविलवाना प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच यांची नातेवाईक महिला जी सध्या अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे त्यांनी तक्रारदार यांच्यासह त्या ठिकाणी चौकशी अधिकारी यांना सुद्धा अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्यांचा भडीमार केला त्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले 

स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी सरपंच  व ग्रामपंचायत अधिकारी हे कोणत्या स्तराला जातात हे मात्र बाळापूर येथे हे पाहायला मिळाले हे अत्यंत घातक आणि दुर्दैवाचा आहे 

वरिष्ठ अधिकारी यांनी बाळापूर येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची तात्काळ जिल्हा परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावून त्याविरुद्ध कारवाई करावी व केलेल्या तक्रार अर्जातील अनुषंगाने पुन्हा चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रारदाराने मागणी केली आहे 
 
तक्रारदारांनी असे म्हटले आहे की, आज दिनांक:०८/०१/२०२६ रोजी जरी चौकशी अधिकारी साहेबराव शेळके यांनी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल मात्र मी त्यांना त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय सोडणार नाही 
असा पवित्रा मात्र त्यांनी घेतलेला आहे 

आता पुढे गटविकास अधिकारी हे काय निर्णय घेतात व संबंधिताविरुद्ध काय काय कार्यवाही करतात हे पाहणं तेवढे महत्त्वाचे ठरेल.

0 Response to "सिल्लोड तालुक्यातील मौजे बाळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचार बाबत चौकशी अधिकारी साहेबराव शेळके यांनी केली गोलमोल चौकशी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article