-->
फुले दाम्पत्याचे विचार समाज परिवर्तनासाठी आवश्यक - जिल्हा अध्यक्ष भेंडारकर.

फुले दाम्पत्याचे विचार समाज परिवर्तनासाठी आवश्यक - जिल्हा अध्यक्ष भेंडारकर.

  नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

सडक अर्जुनी :- ११ जानेवारी महात्मा फुले यांनी उभारलेली समतेची चळवळ आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली स्त्री शिक्षणाची क्रांती ही केवळ एका काळापुरती मर्यादित नव्हती, तर ती आजही समाजाला दिशा देणारी प्रेरणास्थाने आहेत. त्यांचे विचार अंगीकारल्याशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा परीषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

तालुक्यातील राका /पळसगाव येथे महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त १० जानेवारीला आयोजित कार्यक्रमात भेंडारकर बोलत होते. यावेळी पं. स. सभापती चेतन वडगाये, जि. प. सदस्य कविता रंगारी, सरपंच राजेश रामटेके, उपसरपंच मधुसूदन दोनोडे, दमयंता उपरीकर, निर्मला

बाराका

जयंती सोहळा

मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष भंडारकर, सोबत मान्यवर

ब्राह्मणकर, यामिनी मेंढे, सुषमा दोनोडे, शिल्पा चांदेवार, महेंद्र हटेले, दुलिचंद चाकाटे, बळीराम वाघाडे, आशिष नागोसे आदी उपस्थित होते.

भेंडारकर म्हणाले की, समाजात आजही जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि स्त्रीविषयक अन्याय कायम आहे. अशा परिस्थितीत फुले दाम्पत्याचे विचार केवळ स्मरणात ठेवणे नव्हे, तर प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.

महात्मा फुले यांनी शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी दिलेला संघर्ष हा भारतीय समाजाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. शिक्षणाशिवाय समाज प्रगती करू शकत नाही आणि शिक्षित महिला म्हणजे सक्षम कुटुंब व सक्षम राष्ट्र, असा ठळक संदेश भेंडारकर यांनी दिला. आजच्या तरुण पिढीने

केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन चिरंजीव कांचन लोथे यांनी केले तर आभार भुमेश्वर बेंदवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल माळी समाजाचे सचिव लेखीराम इरले यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले.

0 Response to "फुले दाम्पत्याचे विचार समाज परिवर्तनासाठी आवश्यक - जिल्हा अध्यक्ष भेंडारकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article