-->
महिलांनी जिजाऊ-सावित्रीची विचारधारा समजून घ्यावी- मा. अश्विनी ताई भिवगडे.

महिलांनी जिजाऊ-सावित्रीची विचारधारा समजून घ्यावी- मा. अश्विनी ताई भिवगडे.


"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
 
• जिजाऊ- सावित्रीजन्मोत्सव प्रसंगी प्रतिपादन

तुमसर :- स्थानिक शारदा विदयालय तुमसर येथे परिवर्तन वादी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड भंडारा च्या वतीने जिजाऊ-सावित्री जन्मोत्सवं मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.जिजाऊ -सावित्री आईच्या कार्याची गाथा ही घराघरात व मनामनात पोहचली जावी, हा या कार्यक्रमाचा हेतू होता. 
जिजाऊ-सावित्री जन्मोत्सवं कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शिवमती रंजिताताई राजूभाऊ कारेमोरे,मार्गदर्शिका शिवमती अश्विनीताई भिवगडे,विशेष अतिथी म्हणून शिवमती. किरण तितीरमारे प्राचार्य सुदामा विदयालय मोहाडी, शिवमती. कौतुकाबाई सार्वे माजी सरपंच मांगली, शिवमती. प्रीतीताई पडोळे मुख्या. पं. दीनदयाल विदयालय डोंगरला, शिवमती. पूजा लांजेवार डेप्युटी co न. प. तुमसर, शिवमती लीनाताई भुसारी सरपंच खैरलांजी हे उपस्थित होते. सत्कार मूर्ती म्हणून शिवश्री. सागरजी गभणे नगराध्यक्ष न. प. तुमसर तसेच सर्व नवनियुक्त नगरसेविका मा. वैशाली भवसागर, मा. रेखा चकोले, मा. रोशनी भोंडेकर, मा. शाहीन तुरक, मा. वैशाली हिंगणे, मा. नीता तिबुडे, मा अश्विनी धोटे, मा. सोनिया धुर्वे, मा. वर्षा लांजेवार, मा. शीतल पेठे, मा. नलिनी डिंकवार, मा. स्मिता आथीलकर, मा. स्मिता बोरकर, मा. स्वाती सेलोकर यांचा शेला व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवश्री. अनिल भुसारी सर विभागीय अध्यक्ष मसेस,शिवश्री. चंद्रकांत लांजेवार सर जिल्हाध्यक्ष मसेस भंडारा,शिवश्री. राहुल डोंगरे सर मुख्या. शारदा विद्यालय तुमसर, शिवश्री. राजूभाऊ चामट ज्येष्ठ मार्गदर्शक मसेस तुमसर, शिवश्री. श्यामदादा कोसरे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड भंडारा हे होते.
राजमाता जिजाऊ व आई सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिजाऊ वंदना शिवमती. शीतल भुसारी यांनी म्हटले. तसेच कार्यक्रमाचा हेतू व जिजाऊ ब्रिगेड ची भूमिका जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती प्रतिभाताई चौधरी (लांडगे) आपल्या प्रास्ताविके मधून स्पष्ट केली.प्रमुख उपस्थिती म्हणून शिवमती. रंजिताताई कारेमोरे यांनी महिलांनी स्वतः ला ओळखून आपलं कार्य करावं, असं वक्त्यव्य केले. तसेच प्रमुख
मार्गदर्शक म्हणून शिवमती. अश्विनी ताई भिवगडे यांनी आपल्या ओजस्वी व कणखर वाणीने उपस्थित सर्व नगरसेविका व समस्त भगिनी यांनी जिजाऊ,सावित्री, रमाई यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जबाबदारी पार पाडावी, असे संबोधित केले. महिलांच्या रांगोळी, पुष्पगुछ सजावट, गायन, नृत्य अशा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच त्यांना प्रथम, द्वितीय व प्रोत्साहन पर बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
जिजाऊ -सावित्री जन्मोत्सवं च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती. नितुताई सपाटे सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार शिवमती.लक्ष्मी ताई सार्वे मॅडम सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरिता मराठा सेवा संघ तुमसरच्या तालुकाध्यक्ष शिवमती. प्रीतीताई भोयर, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती.हिराताई बोन्दरे, जिजाऊ ब्रिगेड तुमसरच्या उपाध्यक्ष नितुताई घटारे,जिल्हा सचिव शिवश्री.अनिलदादा झंझाळ,शिवश्री. मने सर, काळे सर, दीपकदादा बांते, संजुदादा सार्वे तर जिजाऊ ब्रिगेड चे पदाधिकारी शिवमती अंजली लांजेवार, निरूपमाताई भोयर,कल्पनाताई चामट, सुगंधाताई डोंगरे, सुलभाताई हटवार, रंजनाताई सिंगनजुडे, शुभांगी हणमंलवार, खुशबू कारेमोरे, करिष्मा झंझाळ, भाग्यश्री कोसरे,बाली सार्वे, पूजा पेटकर, रत्न माला मने यांनी सहकार्य केले.

0 Response to "महिलांनी जिजाऊ-सावित्रीची विचारधारा समजून घ्यावी- मा. अश्विनी ताई भिवगडे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article