शारदा विद्यालय, तुमसर येथे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचा प्रेरणादायी उत्सव.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
• आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष इंजि सागर गभणे, तहसीलदार उपेश अंबादे, शाळेचे माजी विद्यार्थी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर:- तुमसर येथील शारदा विद्यालयात आयोजित तीन दिवसीय स्नेह संमेलन सोहळा हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, आठवणी, संस्कार, कृतज्ञता आणि प्रेरणेचा जिवंत उत्सव ठरला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
स्नेह संमेलनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तुमसर मा. सौ. अर्चना भिवगडे / माटे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सनदी लेखापाल (C.A.) शुभम गायकवाड (नागपूर) हे विराजमान होते.
यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थिनी व बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), साकोली सौ. योगिता परसमोडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. स्नेहा गभने (भंडारा), वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता वैद्य / आसोले (कामठा आश्रम) उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. रामकुमार अग्रवाल (सचिव, पूजा शिक्षण संस्था), सौ. जयश्री गभने (उपाध्यक्ष, शिक्षक–पालक संघ), सौ. रेखाताई बिसेन (उपाध्यक्ष, माता–पालक संघ), सौ. बिसेन (सहसचिव, माता–पालक संघ), मुख्याध्यापक राहूल डोंगरे, शाळा नायिका बालिका ठवकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
स्नेह संमेलनाच्या औचित्याने आयोजित विज्ञान प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी, पाककला व गालिचा प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, मेहनतीला व सर्जनशीलतेला मिळालेली ही दाद सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली.
माजी विद्यार्थी व विशेष अतिथींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत “आम्ही येथे घडलो, आता तुम्ही घडा” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला. नियमित अभ्यास, चांगल्या मित्रांची संगत, शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून ऐकणे, मोबाईलचा मर्यादित वापर, वाचनाची आवड, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्याची जपणूक, स्मार्ट वर्क, अभ्यासाचे नियोजन व समस्यांना न घाबरता उपाय शोधण्याची कला — या जीवनमूल्यांवर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहूल डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन यशस्वी नवखरे व नूपुल शहारे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन माही मेश्राम यांनी केले.
इयत्ता ५ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
विविध शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार मा. राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे, तहसीलदार उपेश अंबादे, मा. रामकुमार अग्रवाल (सचिव, पूजा शिक्षण संस्था, तुमसर), सौ. रेखाताई बिसेन (उपाध्यक्ष, माता–पालक संघ), शाळेच्या माजी विशेष अतिथी व मुख्याध्यापिका सौ. मनीषा समरीत, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुमसर इंजि. रसिका वैद्य, डॉ. जितेंद्र कुंभलकर, ग्राम महसूल अधिकारी अरोली दुर्गा लांजेवार, सहाय्यक शिक्षक शिल्पा रंगारी, डॉ. सानिका भिवगडे (नागपूर), सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजि. प्रयास डोंगरे (मुंबई), सौ. जयश्रीताई गभने (उपाध्यक्ष, पालक–शिक्षक संघ) यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार मा. राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे व तहसीलदार उपेश अंबादे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून “स्वप्न मोठी ठेवा, पण पाय जमिनीवर ठेवा. तुमच्यातील क्षमता ओळखा. यश हे प्रयत्न, शिस्त व सातत्यावर उभे असते. अपयश घाबरवणारे नसून घडवणारे असते” असे मार्मिक विचार व्यक्त केले.
तीन दिवसीय स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग व शाळेच्या प्रत्येक घटकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. हा स्नेह संमेलन सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्कारक्षम, प्रेरणादायी व अविस्मरणीय पर्व ठरला, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
0 Response to "शारदा विद्यालय, तुमसर येथे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचा प्रेरणादायी उत्सव."
एक टिप्पणी भेजें