-->
पुणे दिनांक १९ जानेवारी २०२६ आंदोलनाचा ५२ वा दिवस.

पुणे दिनांक १९ जानेवारी २०२६ आंदोलनाचा ५२ वा दिवस.


   "साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी..

पुणे :- विद्यार्थी गृह संस्थेतील गैरकारभार व करोडो रुपये भ्रष्टाचार कार्यवाहीसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे 
   प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे या संघटनेने ५२ दिवस आंदोलनाचा उच्चांक आहे अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे तरीही निर्णय घेण्यासाठी एवढा उशीर का ? अशीही चर्चा आहे पण तुम लढो हम कपडे सांभाळते है या म्हणीप्रमाणे आजचे समाज जीवन आहे ; भारतीय लोकमानस हा गुलामी प्रवृत्तीचा आहे त्यामुळे आम्ही अनेक वेळा पारतंत्र्यात होतो ; शक कुशाण हून इत्यादींनी भारतावर हल्ले केले; लचके तोडले नंतर मोगलांनी सुमारे ८०० वर्षे आपल्यावर राज्य केले आम्ही गुलामी मान्य केली विरोध केला नाही असेच इंग्रजांनी पुन्हा आमचेवर १५० वर्षे राज्य केले आम्ही गुलामी मान्य केली असे आम्ही गुलामी मानसिकतेचे आहोत अजूनही स्वातंत्र्य मिळूनही आम्ही मनाने स्वतंत्र नाही भारतीय राज्य घटनेने मूलभूत हक्क दिले आहेत तरीही आपण जाणिवेने हक्कासाठी लढत नाही अन्याय निमुटपणे सहन करतो त्यामुळे न्याय मिळत नाही अशीच परिस्थिती सर्वत्र दिसून येते म्हणून आज अन्याय होऊन ही आंदोलनात सहभागी होत नाही; सर्व काही आयते मिळाले पाहिजे ही वृत्ती घातक आहे पुणे विद्यार्थी गृह संस्थेतील गैरकारभार व करोडो रुपये भ्रष्टाचार झाला त्याला आम्हीच शिक्षक कर्मचारी जबाबदार आहोत आपण नोकरीचे भीतीने महिलांनी आपली अब्रू जो कोणी संचालक म्हणून आहे त्याला हवाली केली आहे इतर अन्याय तर किरकोळ वाटतात ; अन्याय किती प्रकारचे असतात हे या संस्थेत दिसून येतात ; महाराष्ट्र राज्य मध्ये अशी अन्यायी जुलुमी संस्था शोधून सापडणार नाही पण आम्ही अन्यायी जुलुमी संस्था चालकाना शोधून त्यांचे हाल हाल करून जेलमध्ये बसण्याची व्यवस्था करणार आहोत; कितीही दिवस आंदोलन करावे लागले तरी करणार आहोत असे शिक्षक नेते अंबादास सैदु शिंदे यांनी सांगितले आहे.

0 Response to "पुणे दिनांक १९ जानेवारी २०२६ आंदोलनाचा ५२ वा दिवस."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article