वंचित बहुजन आघाडी औंढा तालुक्याची सर्कल प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न"
सोमवार, 19 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
औंढा :- तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सर्कल प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत अनिल कांबळे, जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत ठाम भूमिका जाहीर करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर अनिल कांबळे यांनी संकल्प व्यक्त केला की येणाऱ्या निवडणुकांमध्ये औंढा तालुक्यातील नव जिल्हा परिषद सर्कल व १८ पंचायत समिती गण वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकतीने, संघटनात्मक बळावर लढवणार आहे. बहुजन समाजाच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी कोणतीही तडजोड न करता मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीची सुरुवात वंचित विजय गीताने करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या विजयाच्या आनंदानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बैठकीदरम्यान संघटन वाढ, बूथस्तरीय तयारी, जनसंपर्क अभियान व आगामी निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचा समारोप अत्यंत शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात राष्ट्रगीताने करण्यात आला. या बैठकीमुळे औंढा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची निवडणूक तयारी अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या..बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जी, औंढा तालुका अध्यक्ष सुनील मोरे, औंढा शहराध्यक्ष अरविंद मुळे, औंढा तालुका उपाध्यक्ष राजरत्न सुतारे, तालुका संघटक गौतम वाटोडे, तालुका महासचिव अभयराज भगत, युवा तालुका अध्यक्ष आशिष खंदारे, संजय गायकवाड, जयप्रकाश पुंडगे, विजय काशीदे,
प्रदीप सोनवणे, गुलाबराव भिसे, यशवंत भिसे, सुरेश खिल्लारे, भीमराव घोंगडे, विजय वाळवंटे, रणवीर भिसे, किशोर भुक्तर, राहुल पुंडगे, सुनील पुंडगे, मिलिंद इंगोले, भीमराव बगाटे, माधव घोंगडे, राहुल खिल्लारे, अमोल धवसे, उत्तमराव राठोड, विशाल धवसे, अमोल दिपके, चंद्रमुनी मुळे, सुभाष मुकाडे, धोंडबाराव घोंगडे, किशन गायकवाड, प्रताप घोंगडे, प्रभाजी घोंगडे आदी... कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 Response to "वंचित बहुजन आघाडी औंढा तालुक्याची सर्कल प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न""
एक टिप्पणी भेजें