-->
देशभक्तीच्या सुरांनी शारदा विद्यालयात जागवली राष्ट्रसेवेची जाणीव.

देशभक्तीच्या सुरांनी शारदा विद्यालयात जागवली राष्ट्रसेवेची जाणीव.



• पोलीस विभागाचा प्रेरणादायी उपक्रम.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- देशभक्ती ही केवळ घोषणा नसून ती कृतीतून व्यक्त व्हावी, याचा जिवंत प्रत्यय भंडारा जिल्हा पोलिस बँड पथकाने शारदा विद्यालय व कन्याकनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथे दिला. रेझिंग डे सप्ताह व बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, शिस्त आणि जबाबदारीची प्रेरणा निर्माण केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक मा. नुरुल हसन व उपअधीक्षक मा. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बँड पथकाने सादर केलेल्या “मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू”, “जयस्तुते जयस्तुते”, “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” आणि “ये मेरे वतन के लोगो” या गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत देशासाठी काहीतरी करण्याची उमेद झळकत होती.

कार्यक्रमात आय.पी.एस. मा. मयंक माधव (पोलीस उपविभागीय अधिकारी) व पोलीस निरीक्षक मा. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मा. प्रवीण सयाम यांनी सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. मोबाईल व इंटरनेटचा विवेकी वापर, फसवणूक टाळण्याचे उपाय आणि कायदेशीर जबाबदाऱ्या यांचे मार्गदर्शन करताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा संदर्भ देत “सजग विद्यार्थी म्हणजे सुरक्षित समाज” हा संदेश दिला.

विद्यालयाचे प्राचार्य राहूल डोंगरे यांनी पोलिस विभागाचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. शांतता, सुव्यवस्था व जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या भंडारा जिल्हा पोलिस विभागाचे मनःपूर्वक आभार ज्योती बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नितुवर्षा मुकुर्णे यांनी केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये केवळ देशभक्तीची भावना जागवणारा नव्हे, तर जबाबदार नागरिक घडवण्याची प्रेरणा देणारा ठरला. शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान या मूल्यांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात पेरणारा हा कार्यक्रम तुमसरच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनात प्रेरणादायी ठसा उमटवणारा ठरला.

0 Response to "देशभक्तीच्या सुरांनी शारदा विद्यालयात जागवली राष्ट्रसेवेची जाणीव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article