-->
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर अंतर्गत अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर अंतर्गत अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई.



"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- तुमसर उपविभागात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अपराध क्रमांक 17/2026 नोंदविण्यात आला असून आरोपी ट्रक चालक व मालक फरार आहेत.

दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान, मौजा खापा (तुमसरपासून ५ किमी दक्षिण) येथे ही कारवाई करण्यात आली. जिल्हा गस्त व उपविभागीय गस्त दरम्यान पेट्रोलिंग करत असताना, पो.स्टे. तुमसरचे पो.हवा. टेकाडे/१५६९ यांनी CFS मार्फत तिरोडा येथून तुमसरकडे एका आयशर ट्रकमधून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी स्टाफसह नाकाबंदी केली. नाकाबंदी पाहताच संबंधित आयशर ट्रक चालकाने ट्रक रस्त्यावर उभा करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पाठलाग करूनही तो मिळून आला नाही. पंचासमक्ष पाहणीत टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक MH 40 CM 2468 मध्ये २७ गोवंशीय बैल निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्याचे आढळून आले.

जप्त मुद्देमालामध्ये

१६ लाल रंगाचे बैल (प्रत्येकी ₹१५,०००) – ₹२,४०,०००

६ पांढऱ्या रंगाचे बैल (प्रत्येकी ₹१५,०००) – ₹९०,०००

५ काळ्या रंगाचे बैल (प्रत्येकी ₹१०,०००) – ₹५०,०००
असा एकूण २७ बैलांची किंमत ₹३,८०,०००, तसेच आयशर ट्रक अंदाजे ₹१०,००,००० असा एकूण ₹१३,८०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम ११(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रक चालक व मालकाचा शोध सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे व मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर येथील पो.उपनि. पुरुषोत्तम राठोड (वाचक फौजदार) यांनी केली.

0 Response to "उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर अंतर्गत अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article