-->
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.


 सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
उल्हासनगर :- महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हे देखील यावेळी उपस्थित होते.

0 Response to "उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article