-->
पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल.

पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पालांदूर :- मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीयस्तरावर 'झाडे लावा, झाडे जगवा' या मोहिमेचा कितीही उद्घोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाही. लाखनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्र हद्दीतील किटाडी क्षेत्र साहाय्यक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पालांदूर परिसरात राजरोसपणे होत असलेली वृक्षांची कत्तल ही बाब नित्याचीच झाली आहे.

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले असून, असमतोल वाढला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर 'शतकोटी वृक्ष लागवडी' सारख्या अनेक योजना राबविल्या जात

आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यावर कोट्यवधींचा खर्च होत असताना दुसरीकडे मात्र शेतामधील हजारो झाडांवर ठेकेदारांच्या माध्यमातून कुऱ्हाड चालविली जात आहे. पालांदूर परिसरासह लाखनी तालुक्यात अनेक भागात तोडून ठेवलेल्या लाकडांमुळे मोकळ्या मैदानांना जणू 'लाकूड आगारा'चे स्वरूप आले आहे. आंबा, चिंच, टेंभुर्णी, बोर, जांभूळ अशा फळझाडांसोबतच कडुलिंब, अंजन, कीन, बाभूळ, मोह, सागवान अशा वृक्षांची लागवड शेतशिवारात करण्यात आली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सर्रास सुरू असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.

0 Response to "पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article