पालक–शिक्षक–विद्यार्थी त्रिवेणी संगमातूनच घडते सृजनशील पिढी: प्राचार्य राहूल डोंगरे.
रविवार, 25 जनवरी 2026
Comment
• तुमसर पब्लिक स्कूल मध्ये प्रतिपादन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- स्थानिक तुमसर पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना घडवायचे असेल तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा त्रिवेणी संगमातून सृजनशील पिढी घडते .संस्कार बालपणापासूनच घडत असतात. विद्यार्थी हे मोठ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे पिढी घडविणाऱ्या प्रत्येकाचे स्वतःचे आचरण आदर्शवत असले पाहिजे. छत्रपती शिवराय घडविण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ होणे आवश्यक आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असे नमूद करत त्यांनी वाचनसंस्कृतीवर विशेष भर दिला. आज वाचनसंस्कृती निर्माण करायची असेल तर आई–वडिलांनी स्वतः पुस्तक वाचनाची सवय लावली पाहिजे. तेव्हाच मोबाईल संस्कृतीला आळा बसेल व विविध आजारांपासून मुक्तता मिळू शकेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी प्रत्येक पालकाने मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते कार्यक्रमाचे प्रमुख वक़्ते म्हणून बोलत होते.शाळेच्या सचिव श्रीमती गीता ढेंगे ,मुख्याध्यापिका वैशाली लांजेवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दक्षता जैस्वाल यांनी केले. तारिका पाटले यांनी उत्कृष्ट ‘अॅन्युअल रिपोर्ट’ वाचन केले, तर कार्यक्रमाचा समारोप ज्योती बुराडे यांनी ‘वोट ऑफ थँक्स’द्वारे केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका बिंदू केवट , नलिनी देशमुख , मनीषा कटरे , योगिता बावनकर , माधुरी राघवे , अपर्णा डोंगरे , आरती राहांगडाले , प्रतिभा रामटेक , सरिता शनिचरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण स्नेहसंमेलन शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि यशस्वीरीत्या पार पडले.
0 Response to "पालक–शिक्षक–विद्यार्थी त्रिवेणी संगमातूनच घडते सृजनशील पिढी: प्राचार्य राहूल डोंगरे."
एक टिप्पणी भेजें