मौदी पुनर्वसन येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.
शनिवार, 24 जनवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील मौदी पुनर्वसन ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व महिलांच्या मोठ्या सहभागात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. जयश्री विनोद वंजारी (माजी सरपंच, मौदी) यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन ग्रामसेवक बोरकर साहेब यांनी केले. यावेळी सौ. मीनाक्षी लांडगे, कृषी सहाय्यक अधिकारी, भंडारा तसेच गावातील महिला मंडळातील असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी महिलांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मोदी ग्रामपंचायतीच्या भव्य पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये सामाजिक एकोपा, आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महिला मंडळ व ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले. अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे महिलांना व्यासपीठ मिळून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हा कार्यक्रम पुनर्वसन तालुका, जिल्हा भंडारा येथील पहिल्या जिल्हा परिषद क्षेत्रात सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरला.
0 Response to "मौदी पुनर्वसन येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न."
एक टिप्पणी भेजें