जामगाव येथे बौद्ध महासभा पंच कमिटी च्या वतीने वर्धापन दिन उत्साहात साजरा.
शनिवार, 24 जनवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील जामगाव येथे भारतीय बौद्ध महासभा पंचकमिटी जामगाव च्या वतीने वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे उद्घाटन सूर्यभान खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले.सहउद्घाटक म्हणून रणभिड हुमने होते. अध्यक्षस्थानी लिमचंद बौद्ध होते. वर्धापन दिनानिमित्त गावातून धम्म रॅली काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती. व रात्री ८ वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना पहेला च्या वतीने स्वप्निल बनसोड यांचा आर्केस्ट्रा चा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सहकार्य केले.
0 Response to "जामगाव येथे बौद्ध महासभा पंच कमिटी च्या वतीने वर्धापन दिन उत्साहात साजरा. "
एक टिप्पणी भेजें