कल्याण येथे बार्टी , पुणे पुरस्कृत व एम.सी.ई. डी, ठाणे, आयोजित मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम....
बुधवार, 7 जनवरी 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
ठाणे: - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), पुणे पुरस्कृत आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्या अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ठाणे, आयोजित ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवती, महिला - पुरूषांना उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी १७ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी अचिवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, मल्हारनगर, जोशीबाग, कल्याण (प) येथे एक महिना कालावधीचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा झाला.
ठाणे जिल्ह्यातील बार्टीद्वारे स्थापित स्वयंसहायता गटातील अनुसूचित जातीमधील युवक-युवती आणि महिला- पुरुष यांच्यासाठी एक महिना कालावधीचा मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. १७ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत अचिवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, मल्हारनगर, जोशीबाग, कल्याण (प) येथे आयोजित केला आहे. एकूण ३० पात्र लाभार्थी मुलाखती मार्फत निवडले असून त्यांना येथे एक महिना सदरील ट्रेनिंग मोफत दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास केंद्र बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक होऊन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्या. असे मार्गदर्शन केले. आर्थिक साक्षरता विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र,ठाणे सविता पावसकर यांनी देखील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MCED ठाणे च्या समन्वयक डॉ. संध्या येवले यांनी केले. या वेळी सर्व समतादूत, समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमात अनुसूचित जाती प्रवगांतील युवक-युवतींचा समावेश असणारी बॅच सुरु झाली आहे. MCED व बार्टीच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम नियोजन पद्धतीने घेण्यात येत आहेत. कार्यक्रमात उद्योग - व्यवसाय कोणता करावा,कसा करावा, कुठे करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येऊन उद्योग व्यवसायातील अनेक उद्योग संधी बद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्योगांना भेटी, शासनाच्या कर्ज व सबसिडी योजना, अनेक शासकीय महामंडळाच्या योजना, बँकाची कार्य पद्धती व कर्ज, याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.
0 Response to "कल्याण येथे बार्टी , पुणे पुरस्कृत व एम.सी.ई. डी, ठाणे, आयोजित मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम...."
एक टिप्पणी भेजें