-->
जातीय अत्याचारात खुन झालेल्या ८८९ पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणाऱ्या NDMJ संघटनेचा ऐतिहासिक लढा

जातीय अत्याचारात खुन झालेल्या ८८९ पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणाऱ्या NDMJ संघटनेचा ऐतिहासिक लढा

भिमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमातून भिम अनुयायांनी मुख्यमंत्री यांना लिहिले हजारो पोस्ट कार्ड.

   सोनु संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भिमा कोरेगाव/पुणे :- अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध सातत्याने संघर्ष करणारी आणि पीडित कुटुंबांना हक्काचा न्याय मिळवून देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक संघटना 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विजयस्तंभ भीमा-कोरेगाव येथे भव्य 'पोस्टकार्ड अभियान' राबवण्यात आले आहे.

अनुसूचित जाती आणि जमातींच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर जनआंदोलन उभारणाऱ्या या संघटनेने आजवर राज्यातील खून झालेल्या ८८९ पीडित कुटुंबांना शासन दरबारी पाठपुरावा करून नोकरी, जमीन आणि पुनर्वसन मिळवून दिले आहे. आता याच कार्याचा पुढचा टप्पा म्हणून लाखो भीम अनुयायांच्या सहभागातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ५० पैशांच्या पोस्टकार्डद्वारे जनभावना व्यक्त करण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे*
*१. बजेट कायदा: अनुसूचित जाती-जमातींचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये आणि त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी महाराष्ट्रात 'बजेटचा कायदा' तात्काळ लागू करावा. २. नितीन आगे प्रकरण: खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणाची फेरतपासणी करून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. ३. शशांक योजना: ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात 'शशांक योजना' लागू करावी. ४. स्वतंत्र न्यायालये: प्रत्येक जिल्ह्यात ॲट्रॉसिटी प्रकरणांसाठी स्वतंत्र आणि जलद गती (Fast Track) न्यायालये सुरू करावीत. ५. जमीन वाटप: दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी रद्द करून भूमिहीन अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना शासकीय जमिनींचे वाटप करावे. ६. बढती आरक्षण: पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा (Reservation in Promotion) कायदा तात्काळ पारित करावा.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात येऊ नये,
खैरलांजी भैयालाल भोतमांगे सामुदायिक हत्या प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्म ठेप कायम करण्यात यावी अशी मागणी जनतेच्या वतीने पोस्ट कार्ड लिहिण्याच्या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, सामाजिक क्षेत्रातील नामवंत विचारवंतांनी व सिने कलावंत, लेखक यांनी सहभाग घेतला.
*हे अभियान संघटनेचे राज्य महासचिव ॲड. डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सचिव वैभव गीते, राज्य सहसचिव पी.एस.खंदारे, राज्य महिला संघटक. पंचशीला कुंभारकर,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे .यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवले आहे. "केवळ घोषणा नको तर अंमलबजावणी हवी," हा पवित्रा घेऊन NDMJ चे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.*
पोस्ट कार्ड अभियान यशस्वी करण्यासाठी एनडिएमजे च्या जयंत पोटे, विकास भारस्कर, सुनिता गरुड, सत्यवान गरुड, विश्वनाथ घोडके, आम्रपाली मोहिते, लक्ष्मी वाघमारे, सिद्धार्थ ओव्हाळ, विक्रांत भोसले,किरण सोनवणे, अजय चंदनशिव, प्रथमेश कुंभारकर,रोहण जगताप,शुभम खवळे,संजय माकेगावकर,आशिष धांडोरे, अविनाश ताकतोडे आदी 
कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

0 Response to "जातीय अत्याचारात खुन झालेल्या ८८९ पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणाऱ्या NDMJ संघटनेचा ऐतिहासिक लढा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article