-->
भारतीय समाजसेवा पुरस्काराने उमेश मेश्राम सन्मानित.

भारतीय समाजसेवा पुरस्काराने उमेश मेश्राम सन्मानित.

,
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील समाजसेवक उमेश हिरालाल मेश्राम यांना नुकतेच जीवन जागृती सेवा संस्थान प्रयागराज, उत्तर प्रदेश  ISO 9001:2015 प्रमाणित  संघटनेच्या वतीने आयोजित  "भारतीय गौरव प्रतिभा सन्मान 2025 " सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार त्यांना गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, शालेय साहित्य निशुल्क उपलब्ध करून देण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा प्रयागराज येथील सी.पी. एस. कॅस्टल क्लब, सिविल लाईन, प्रयागराज ( उ. प्र.) येथे दिनांक 25/12/2025 रोजी संपन्न झाला.

 पुरस्कार इंजिनीयर आकाश शाहू व संस्थेचे डायरेक्टर इंजिनियर प्रदीप कुमार शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. मागील पाच वर्षांमध्ये 233 गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, शालेय साहित्य निशुल्क उपलब्ध करून दिले आहे. जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजसेवा कार्य गरीब गरजू अनाथ मुलांचे मदत केल्यामुळे समाजात सकारात्मक बदलाची दिशा मजबूत झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या अगोदर सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, मातृभूमी सोशल फाउंडेशन व झेप फाउंडेशन पुणे यांच्याकडून महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, तसेच भारत माता अभिनंदन संघटन दिल्ली यांच्याकडून आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार मिळाले आहे

0 Response to "भारतीय समाजसेवा पुरस्काराने उमेश मेश्राम सन्मानित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article