-->
​लाखनी तालुक्यात १९ जानेवारीपासून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थरार; गुरढा येथे भरणार खेळाडूंची जत्रा.

​लाखनी तालुक्यात १९ जानेवारीपासून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थरार; गुरढा येथे भरणार खेळाडूंची जत्रा.



नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

​लाखनी :- जिल्हा परिषद भंडारा (शिक्षण विभाग प्राथमिक) व पंचायत समिती लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा महोत्सव दि. १९, २० आणि २१ जानेवारी २०२६ दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुरढा (गोंडेगाव) तालुका लाखनी येथील क्रीडांगणावर संपन्न होणार आहे.
​भव्य उद्घाटन सोहळा
सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले आणि विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्षा कविता उईके असतील.
या महोत्सवासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जि.प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण सभापती नरेश ईश्वर कर, समाजकल्याण सभापती मा. शितलताई राऊत, महिला व बालकल्याण सभापती मा. अनिताताई नलगोपुलवार, जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे, पंचायत समिती लाखनीच्या सभापती अश्विनी मोहतुरे, उपसभापती सुनील बांते यांच्यासह अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत.
​तीन दिवस चालणार क्रीडा व सांस्कृतिक उत्सव
तालुक्यातील शेकडो विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या क्रीडा गुणांचे आणि कलागुणांचे प्रदर्शन करणार आहेत. 
नाट्यमय घडामोडी नंतर गुरढा येथे होणार रंगतदार सोहळा 
तालुका स्तरीय क्रीडा सत्र सुरवातीला गुरढा येथे घ्येन्याचे ठरले होते नंतर राजकीय आणि आर्थिक पावर वापरून हे संमेलन केसलवाडा (पवार)येथे होणार असे जाहीर केले. परंतु लाखनी पंचायत सभापती अश्विनी मोहतुरे यांनी हे क्रीडा संमेलन आपल्याच क्षेत्रात व्हावे असा आग्रह धरला आणि अखेर हो -नाही म्हणता he गुरढा येथे होत आहे.
या क्रीडा सत्रात कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने गुरढा परिसरातील जनतेला पाहायला मिळणार आहे.या महोत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरु असून या त्रैदिवसीय महोत्सवाला तालुक्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती अश्विनी मोहतुरे आणि गुरढाचे सरपंच किशोर घरट आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्योधन मानकर, ग्रामपंचायत कमिटी आणि शालेय व्यवस्थापण कमिटी गुरढा व संयोजकांनी केले आहे.

0 Response to "​लाखनी तालुक्यात १९ जानेवारीपासून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थरार; गुरढा येथे भरणार खेळाडूंची जत्रा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article