आई साविञीबाई फुले जयंती निमित्य.
शनिवार, 3 जनवरी 2026
Comment
कविता
हो साविञी तुझे मी फेडीन पांग सारेss
हो साविञी तुझे मी फेडीन पांग सारेss
आणीन वंदनेला हे सूर्य-चंद्र तारे !!
आई, तुझ्यापुढे मी, आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
हो आई तुझे मी फेडीन पांग सारे
आई , तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला
हो आई तुझे मी फेडीन पांग सारे
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या जयंतीने गेली भिजून वाणी
हो आई तुझे मी फेडीन पांग सारे
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी
गौतमाची ललाट रेषा बनते प्रयोगअशी
हो आई तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन वंदनेला हे सूर्य,चंद्र तारे
कवी गौतम धोटे
गौतम नगरी चौफेर.
0 Response to "आई साविञीबाई फुले जयंती निमित्य."
एक टिप्पणी भेजें